प्रवेशित कु. पुजा मानसिंग डुमाला वय वय ०८ वर्षे १० महिने या बालिकेसाठी बाल कल्याण समिती, अमरावती यांचे आवाहन Entered Ms. Child Welfare Committee, Amravati Appeal for Puja Mansingh Dumala Age 08 Years 10 Months

235

✒️अमरावती (Amaravati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

अमरावती (दि.20 जून) :- प्रवेशित कु. पुजा मानसिंग डुमाला वय वय ०८ वर्षे १० महिने सदर बालिकेची आई बालिकेच्या वडिलांना गावी जाऊन येते असे सांगून सदर बालिका व तिच्या लहान बहिणीला घेऊन निघून गेली ते आजपर्यंत परत आली नाही.

सदर बालिकेच्या वडिलांचा शोध परतवाडा पोलिसांनी घेऊन चौकशी केली असता बालिकेच्या आईबाबत वरीलप्रमाणे माहिती सांगितली. तसेच बालिकेच्या वडिलांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सदर बालिकेचा सांभाळ करण्यास सक्षम नाही असे सांगितले.

त्यानुसार सादर बालिकेस काळजी व संरक्षणासाठी बाल शिक्षण केंद्र (मुलींचे बालगृह), अमरावती येथे दाखल करण्याचे आदेश दिले. (आदेश क्रमांक १२७४/ दि. ०३/१२/२०२२). त्यानंतर सदर बालिका ०६ वर्षांची झाल्यानंतर पुढील पुनर्वसनासाठी बालगृह होलिक्रॉस, कॉन्व्हेंट, परतवाडा येथे दालख करण्याचे (आदेश नंबर …. /दि. ०५/१०/२०२०) आदेश देण्यात आले.

सदर बालिका पुजा मानसिंग डुमाला वय वय ०८ वर्षे १० महिने हिच्या आई-वडील व नातेवाईकांना आवाहन करण्यात येथे कि त्यांनी निवेदन प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांच्या आता बालगृह होलिक्रॉस कॉन्व्हेंट, परतवाडा मोबाईल नंबर – ९६९९१३२१२३ या नंबरवर किंवा बाल कल्याण समिती, अमरावती किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अमरावती किंवा परतवाडा पोलीस स्टेशन, परतवाडा, जी. अमरावती यांच्याशी संपर्क साधावा.

दिलेल्या कालावधीमध्ये संपर्क न केल्यास बालिकेचे सर्वोत्तम हित लक्षत घेता ह्या बालिकेचे पूर्णवसन केल्यावर कोणाचाही दावा राहणार नाही याची दखल घ्यावी.