स्मार्ट कापुस अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण Farmer training under Smart Cotton

Share News

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.29 मे) :- आसाळा येथे मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन (SMART) प्रकल्प अंतर्गत खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले.सदर प्रशिक्षणामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री विजय काळे ,मंडळ कृषी अधिकारी शेगांव बु.यांनी कापूस पिकाकरिता पुर्व मशागत,लागवड पध्दत, बियाणे निवड.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन,तण व्यवस्थापन इ. विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी म्हणून श्री गजानन भोयर, तालुका कृषी अधिकारी, वरोरा यांनी स्मार्ट प्रकल्पाविषयी माहिती देऊन गटामार्फत गाठी तयार करुन विक्री करणे व त्यापासून होणारे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.श्री भोंबे ग्रेडर यांनी वेचणी करुन गाठी तयार करणे तसेच विक्री व्यवस्थापन,बाजारभाव याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री पवन मडावी कृषी सहाय्यक यांनी सोयाबीन बिज उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच श्री पवन मत्ते कृषी सहाय्यक यांनी सोयाबीन बिजप्रक्रीया व धान पिकास ३टक्के मिठाची बिजप्रक्रीया प्रात्यक्षिक करून दाखविले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री मारोती व्ही. जांभुळे ,उपसरपंच गट ग्रा. पं. पाचगाव, , श्री राजु .डी.आसुटकर गट प्रमुख, श्री आनंदराव डि. देवगडे प्रगतशील शेतकरी, श्री किशोर एम. डूकरे सामाजिक कार्यकर्ते,सौ. अर्चना बी. गायकवाड सिआरपी महिला गट , श्री विश्वास गुल्हाणे तालुका समन्वयक ,अंबुजा फाउंडेशन, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मारोती जांभुळे, उपसरपंच ,गट ग्रा. पं.पाचगाव यांनी स्मार्ट कापूस प्रकल्पात गावातील शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रकल्प यशस्वी करावा असे आवाहन केले.आभार प्रदर्शन रोशन डोळस कृषी सहाय्यक यांनी केले यावेळी श्री विजय भुते, कृषी पर्यवेक्षक शेगाव बु, कु.माधुरी राजुरकर कृषी सहाय्यक व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share News

More From Author

चिमूर येथे हॉटेलला लागली आग..आंदाजे तीन लाखाचे नुकसान A fire broke out at a hotel in Chimur..Damage estimated at three lakhs

चंद्रपूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धा नेहरू विद्यालय चंद्रपूर येथे संपन्न झाली Chandrapur District Women’s Selection Chess Tournament was concluded at Nehru Vidyalaya Chandrapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *