अन् चक्क उंटावर नवरदेव बसून निघाली लग्नाची वरात And the bridegroom sat on a camel and left for the wedding

Share News

🔸आष्ठा गावात उत्साहपूर्ण वातावरण(Vibrant atmosphere in Astha village)

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.27 मे) :- लग्न आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सोहळा त्यामुळेच लग्न बघावे करून असे बोलल्या जाते. आयुष्यात एकदाच होणारे लग्न अविस्मरणीय व्हावे ही प्रत्येकाची इच्छा असते आणि आपल्या मुलीची पाठवणी करताना आपल्या आयुष्यातील सर्व काही पणाला लाऊन वर पक्षांकडील मंडळींची बडदास्त ठेवतो.

त्याचप्रमाणे आपले लग्न जगावेगळे व्हावे असे प्रत्येक नवरदेवाला वाटत असते. त्यामुळे लग्नाची वरात जास्तीत जास्त आकर्षक असावी, लग्नात मित्र परिवाराने मनमुराद आनंद लुटावा ह्यासाठी महागडे बँड, डी जे, लावुन कुणी महागड्या गाड्या सजवून तर कुणी आकर्षक पांढऱ्या घोड्यावरून वरात घेऊन जातात.

भद्रावती तालुक्यातील आष्टा येथिल एम. ए. बी. एड्. असलेला कृषी केंद्र संचालक नवरदेव अमोल संतोषराव पडवे ह्याचे लग्न यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथिल जया देवरावजी वैद्य हिच्याशी ठरल्यानंतर विवाह सोहळा आपल्या गावातच करण्याचा निर्णय घेतला. आपले लग्न अविस्मरणीय व्हावे असे स्वप्न बघणाऱ्या अमोलने आपल्या लग्नाची वरात जगावेगळ्या पद्धतीने काढण्याचे ठरवून वरातीसाठी चक्क उंट मागवला व उंटावर बसुन थेट लग्न मंडपात पोहचला.

दिनांक 25/5/2023 रोजी उंटावरून निघालेली वरात बघण्यासाठी गावातील एकुणएक व्यक्ती वरातीत सहभागी झाली होती. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात निघालेली ही वरात गावातच नव्हे तर संपुर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली असुन ह्या वरातीच्या स्मृती परिसरातील सर्वांच्या मनात वर्षानुवर्ष घर करून राहील ह्यात शंका नाही.

Share News

More From Author

महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगतची दुकाने हटवा …अमर गोंडाने  Remove the shops near the statue of Mahanav Babasaheb Ambedkar ..Amar Gonda

रामदास आठवले प्रतिष्ठानतर्फे निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना राज्यस्तरीय रणरागिणी पुरष्कार कोल्हापूर जाहीर मध्ये Ramdas Athawale Pratishthan announces state level Ranragini award to fearless journalist Sneha Uttam Madavi in Kolhapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *