वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाची नवीन कार्यकारिणी गठित Warora – Bhadravati – Chandrapur Railway Passenger Union Constituted New Executive Committee

Share News

🔸अध्यक्षपदी राजेंद्र मर्दाने , सचिवपदी जितेंद्र चोरडिया(Rajendra Mardane as President, Jitendra Chordia as Secretary)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 चंद्रपूर (दि.25 मे) :- सन २००७ मध्ये स्थापित वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाची २०२३ – २०२५ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्षपदी समाज कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र मर्दाने तर सचिवपदी प्रसिद्ध व्यावसायिक तथा पत्रकार श्री जितेंद्र चोरडिया यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

         संस्थापक श्री राजेंद्र मर्दाने याच्या नेतृत्वात मागील १५ वर्षांपासून जिल्ह्यात रेल्वे प्रवाश्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांना वाचा फोडून यथोचित मार्गाने समस्या निवारण करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे.

कोरोना संक्रमणानंतर लॉक डाऊन काळात रेल्वे विभागाने घेतलेल्या अनेक निर्णयांचा फटका रेल्वे प्रवाश्यांना बसत आहे. जिल्ह्यातील जनतेला रेल्वेचा अधिकाधिक लाभ मिळावा, रेल्वे स्थानकावर गाडी थांब्यासह अन्य सुविधाही उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रवासी संघ कार्य करीत आहे. 

        सेवानिवृत्त प्राचार्य बी. आर. शेलवटकर यांच्या अध्यक्षतेखाली बोर्डा परिसरात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नुतन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष श्री राजेंद्र मर्दाने, उपाध्यक्षद्वय श्री प्रवीण कडू /श्री प्रवीण गंधारे, सचिव श्री जितेंद्र चोरडिया, सहसचिव श्री अशोक बावणे, कोषाध्यक्ष श्री योगेश खिरटकर.

संघटक श्री राहुल देवडे, प्रसिद्धी प्रमुख श्री बबलू रॉय, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री रितेश भोयर, शरद नन्नावरे, विजय वैद्य, सुधीर खापणे, मयूर दसुडे, हितेंद्र तेलंग, श्याम अवसरमोल, कॅरन्स रामपुरे, पुरुषोत्तम केशवाणी, बंडू देऊळकर, राजेश ताजने, प्रवीण सुराणा, जगदीश तोटावार, साईनाथ कुचनकार, शाहिद अख्तर, संजय गांधी, विलास दारापुरकर, सुरेंद्र चौहान, जुबेर कुरेशी, श्याम ठेंगडी, दत्तश्री ठाकरे, खेमचंद नेरकर, आलेख रट्टे, तुषार मर्दाने,अधिवक्ता राजु लोखंडे, डॉ. प्रवीण मुधोळकर, अभियंता रवि चौहान, ओंकेश्वर टिपले आदींचा समावेश आहे.

           जिल्ह्यात वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाच्या माध्यमातून प्रवाश्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासोबतच नवीन उपक्रम राबविण्यावर व अस्तित्वात असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला जाईल, अशी ग्वाही मर्दाने आणि चोरडिया यांनी दिली.

Share News

More From Author

राजकीय कार्यक्रमातील मांसाहारावर चर्चा म्हणजे बौध्दीक दिवाळखोरीचे प्रदर्शन Discussing meat in a political program is an exhibition of intellectual bankruptcy

रेल्वेखाली येऊन युवकाची आत्महत्या. भद्रावती येथील घटना Youth committed suicide by falling under the train. Incident at Bhadravati

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *