आजीची शाळा संस्कार वर्ग Grandma’s School Sanskar Class

Share News

✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनीधी) 

पुणे ( दि.4 मे ) :- आजीची शाळा संस्कार वर्ग तर्फे उन्हाळ्यात शिबिर आयोजित करण्यात आले .त्यात मुलांना सध्या लोप पावत चाललेले पण शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक शक्ती वाढवण्यास मदत करणारे असे जूने,पारंपारिक खेळ वर्ग घेण्यात आले.त्यात अगदी गोट्या, लिंगोरचा पासून ते अडथळ्यांची शर्यत असे अनेक प्रकार मुलांमधील गुण वाढवण्यास मदत करतात. 

याशिवाय ड्रॉइंग,क्राफ्ट ,ध्यान, योगा अशाही गोष्टी त्यात समाविष्ट होत्या. मुलानी याचा खूप छान आनंद घेतला. 

आजीच्या शाळेत प्रवेश म्हणजे मुल हसत खेळत संस्कार क्षम बनण्याचे एक हक्काचे ठिकाण ही शाळा एक आगळी वेगळी आहे कारण आजीआजोबांचा सहवास लाभत मुले घडतात पण इथे नव्या जुन्याची छान सांगड घालून मुलांना घडविले जाते .

खर तर हा संस्कार वर्ग पण त्यात आजीआजोबा जे शिकवतात त्यामुळेच त्याला शाळा हे नाव तर इथे स्तोत्र मंत्र पाठांतर करून घेतात, शिवाय खेळ,ड्रॉइंग क्राफ्ट, तबला, गाणे,अशा अनेक गोष्टींबरोबर प्रत्येक सणवार एकत्र येऊन मोठ्याच प्रमाणात साजरे होत असतात त्यात मुलांबरोबर पालकांकडून खूप छान प्रतिसाद मिळत असतो .

प्रत्येक कार्यक्रम हा आजी आजोबा व पालक एकत्र येऊन साजरा करणयावर भर देतात त्यामुळेच मुल हे कळत नकळत असे घडते कि जसे पूर्वी आपण वाड्यातील लोकांबरोबर, चाळीतील लोकांबरोबर एकत्र येऊन वाढलो तसे ही नवीन पिढीतील मुले सुशिक्षित बनत आहेत पण यासोबतच संस्कार क्षम बनत आहेत.

मुलाची सहल असो किंवा अगदी रेडिओ वर कार्यक्रम असो पालकांकडून नेहमीच प्रतिसाद मिळत असतो त्यामुळेच आजी पण उत्साहात हे सगळेच करत असतात .रेडिओ वर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात श्रीयांश जोशी,सुहृद कुलकर्णी,मृदांश शिर्के, आदिती मेहता, स्वरा अभ्यंकर, मनवा पंडित, यानी आजी बरोबर संपूर्ण दिनचर्येत येणारे श्लोक व त्याचा अर्थ काय असे पी सी इ टी इन्फीनिटी 94 या रेडिओ वर कार्यक्रम सादर केला 

अशा प्रकारे या संस्कार वर्ग ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहेत तसेच भारताबाहेरील वर्ग पण सुरू आहेत.

यात सर्व पालकांकडून सहभाग असतोच पण सौ .कपाळे,सौ.सिलेंडर,सौ.पंडित, सौ मेहता.सौ.गाधी, सौ.महागावकर अशा अनेक पालकांकडून सहभाग असतो .

मुख्य संपादक : मनोज गाठले 

संपर्क . 9767883091

Share News

More From Author

दिव्यानगाना अपंगांना किराणा किट चे वाटप Distribution of grocery kits to disabled persons

*जय हिंगलाज माता*अभिनेत्री कल्पना भावसार ,( ज्ञानेश्वर माऊली फेम) यांनी अल्प काळात सिनेसृष्टी मध्ये आपला ठसा उमटवला Jai Hinglaj Mata*Actress Kalpana Bhavsar, (of Dnyaneshwar Mouli fame) made her mark in the film industry in a short span of time

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *