शेगाव बाजारवाडीत घाणीचे साम्राज्य Dirt empire in Shegaon Bazarwadi

Share News

🔸दुर्गंधीमुळे नागरिकांचे तसेच व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात(The health of citizens as well as professionals is in danger due to stench)

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि. 4 मे ) :- स्थानिक शेगाव बू ही वरोरा तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे दर सोमवार ला आठवडी बाजार असून बाजारातील पाले भाज्या तसेच गावातील सांडपाणी व अन्य साहित्य बाजाराच्या मुख्य मार्गावर फेकले जाते.

ते सडल्यामुळे त्याचा दुर्गंध पसरत असून या दुर्गंधी मुळे येथे येणाऱ्या नगरकांचे तसेच येथे स्थानिक असलेले दुकानदार यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे तेव्हा नागरिकांच्या आरोग्याचा विचार लक्षात घेऊन सडलेल्या कचऱ्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी .नागरिक तसेच व्यावसायिक करीत आहे.

             स्थानिक शेगाव (बु) मध्ये महिन्याच्या दर आठवड्याला आठवडी बाजार भरात असतो. जावपास ५० ते ६० दुकानदार या आठवडी बाजाराला येत असतात. गावची बाजारपेठ पण चांगलीच मोठी असल्याने बाजाराही जोरदार भरतो. पण यात मात्र आठवडी बाजाराच्या प्रवेश दारावरच घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पण येते त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

त्याच प्रमाणे या घाणीमध्ये डुकरे झोपत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत शेगाव ग्रामपंचायत किती जागरूक आहे हे लक्षात येते. आठवडी बाजाराच्या ठेक्यातून ग्रामपंचायतला लाखो रुपयाचा महसूल मिळतो. पण त्याच्या निम्मा ही ग्रामपंचायत त्यावर खर्च करीत नसल्यामुळे ग्रामपंचायत या पैस्याचे करते तरी काय? हाच प्रश्न नागरिकांना व आठवडी बाजारात दुकानं लावणाऱ्या दुकानदारांना पडत आहे.

तसेच याच आठवडी बाजारात एक शौचालय असताना विनाकारण दुसरे शौचालय बांधण्यात आले. पण त्या पैकी एकही उपयोगात नसल्याने नागरिकांना व खास करुन महिलाना उघड्यावरच बाथरूम ला बसावे लागते. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेली शेगाव ग्रामपंचायत आता तरी झोपेतून जागी होणार कि नाही यांचाच मोठा प्रश्न पडलेला आहे. वारंवार वृतपत्रात वृत्त प्रकाशित करून सुद्धा शेगावं ग्रामपंचायत ला कुठल्याच प्रकारचा फरक पडत नाही.

मुख्य संपादक मनोज गाठले

संपर्क. 9767883091

Share News

More From Author

एक मे कामगारदिनानिमित्त 2023 समाजसेविका राजश्री सुनील शिंदे सातारा . बेस्ट रायटर पुरस्कार देण्यात आला शिर्डी येथे संपन्न झाला   1 May Labor Day 2023 Social worker Rajshree Sunil Shinde Satara. The Best Writer Award was given and concluded at Shirdi

ग्रामगीता महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti Celebration at Gram Gita College

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *