चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ‘अर्थ आठवडा’ साजरा Celebration of ‘Artha Week’ by Chandrapur Municipal Corporation

Share News

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर(दि . 3 मे ) :- पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी स्थानीक पातळीवर पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपाययोजना करण्याच्या शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेने नुकताच ‘अर्थ आठवडा’ साजरा केला.या आठवड्यात पंचमहाभूते – भूमी (जमीन),जल (पाणी), वायू (हवा),अग्नी (ऊर्जा),आकाश (संवर्धन) या सर्व घटकांचे संवर्धन व महत्व सांगणारे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

     मागील काही वर्षात आपण वातावरणातील गंभीर बदल अनुभवत आहोत.वैश्विक पातळीवर या बदलांना अटकाव करण्यासाठी व आपली पृथ्वी वाचविण्यासाठी व्यक्तिगत व सामुहिकपणे पर्यावरण रक्षणाकरिता स्थानीक पातळीवर पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपाययोजना करण्यासाठी राज्यामधील सर्व स्थानिक संस्थांमध्ये २२ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत अर्थ आठवडा साजरा करण्याचे शासनाचे निर्देश होते त्यानुसार हा आठवडा साजरा करतांना महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग यात नोंदविण्यात आला.

     मनपातर्फे सेल्फी विथ ट्री तसेच शालेय स्तरावर ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २२ एप्रिल रोजी विविध शाळांमध्ये पथनाट्ये सादर करून सिंगल युज प्लास्टिकचे दुष्परिणाम, सिंगल युज प्लास्टिकला पर्याय, कचरा विलगीकरण,वायू प्रदूषण,जल प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण,वाहनांचा धुरापासून होणारे दुष्परिणाम,वातावरणीय बदल, कार्बन उत्सर्जन याबद्दल माहिती देऊन त्यांची उपाययोजना कशी करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

    २३ एप्रिल रोजी शहरातील विविध रहिवासी सोसायटी येथे सोलर ऊर्जेचे व सोलर पॅनेलचा वापर करण्याचे महत्व, प्रत्यक्ष घरी रेन वॉटर हार्वेस्टींग का आवश्यक आहे यासंबंधी जनजागृती कार्यशाळा, २४ रोजी अर्थ आठवडा लोगोचे अनावरण व माझी वसुंधरा हरित शपथ, २५ रोजी शहरात स्वच्छता मशाल मार्च काढुन स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. तसेच २६ एप्रिल रोजी महानगरपालिका शाळांमधुन प्रभातफेरी काढण्यात आली.२७ एप्रिल रोजी विविध भागात वृक्ष लागवड करण्यात आली व वृक्षाचे महत्व समजावून सांगण्यात आले.

मुख्य संपादक : मनोज गाठले

संपर्क : 9767883091

Share News

More From Author

चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य वर्धिनी केंद्राचे मा. पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण   Chandrapur Municipal Health Promotion Center Mr. Inauguration by the Guardian Minister

अभिनंदनीय :-  जेष्ठ पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर यांची झेडआरयूसीसी-सेंट्रल रेल्वे सदस्य पदी नियुक्ती Congratulations… Senior Journalist Prashant Vigneshwar appointed as Member of ZRUCC-Central Railway

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *