चंद्रपूर जिल्हा निवड सिनियर बुद्धिबळ स्पर्धा जे.बी.सायन्स कॉलेज मधे संपन्न झाली Chandrapur District Selection Senior Chess Tournament was concluded in JB Science College

Share News

🔹विद्यार्थ्यां करीता अनेक स्पर्धांचे आयोजन करताना आनंद होतो.- प्रा. नीरज आत्राम,आनंदवन(Happy to organize many competitions for students.- Prof. Neeraj Atram, Anandavan)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.1 मे) :- क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर व नीरजा समूह महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा निवड सिनियर बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 30 एप्रिल 2023 ला घेण्यात आली. स्पर्धेत स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

      ही स्पर्धा निवड स्पर्धा होती. खेळाडू मधून 4 स्पर्धकाची जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड करण्यात आली. यामधे प्रथम 

 प्रथम क्रमांक अक्षय बागुलवार, द्वितीय आकाश पंदीलवार, तृतीय आशय मडावी तर चतुर्थ अभिजित आष्टकर यांनी पटकाविले.

प्रथम व द्वितीय विजेत्यांना राज्य बुद्धिबळ स्पर्धा फी करीता प्रत्येकी हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटक प्रा. नीरज आत्राम यांनी सफेद मोहरा चालवून उद्घाटन केले. कार्यक्रमाचे आयोजन व मुख्य आरबीटर मा. नरेन्द्र कन्नाके सर व जगदीश वाघ सर यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका सहज पूर्ण केली. कार्यक्रमाला आयोजित करण्यास नरेंद्र कन्नाके (सहायक शिक्षक,नेहरू विद्यालय शेगाव बूज .),यांनी अथकपणे प्रयत्न केले.स्पर्धा यशस्वी झाल्या बद्दल प्राचार्य बन्सोड मॅडम यांनी व अध्यक्ष मा.आश्विन मुसळे सर या सर्वांनी अभिनंदन केलेले आहे.

Share News

More From Author

वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन Forest Department strives to be the most advanced in the country – asserted Forest Minister Sudhir Mungantiwar

भूसंपादन प्रकरणातील पाच कोटी रक्कम लोक आदालतीमध्ये वसूल 5 crore amount in land acquisition case will be recovered in people’s court

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *