श्री पिरके यांचा सत्कार Tribute to Shri Pirke

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.12 मे ) :- पोलिस स्टेशन शेगाव बू हद्दीतील पोलिस पाटील यांनी आज दिनांक 11.05.2023 रोजी चे 11.00 वा ते 12.30 वा पर्यंत मासिक मीटिंग घेण्यात आली.

पोलिस पाटील यांना गावातील वाद विवाद, जागा, शेती संदर्भात वाद असतील तर त्यांना आधीच भेटून त्याची माहिती घेऊन आम्हाला कळवावे, जने करून आधीच त्यावर योग्य त्या उपाययोजना करता येईल, सीसीटीव्ही लावण्या संदर्भात तसेच इतर महत्वाचे मुद्द्यावर सूचना दिल्या. 

एप्रिल महिन्यात उत्कृष्ट काम करणारे सुसा येथील पुरुष पोलिस पाटील ईश्वर जांबुळे आणि कोकेवाडा (मानकर) येथील महिला पोलिस पाटील यांना पुष्पगुच्छ, सन्मान पत्र आणि शिल्ड देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 

 

तसेच पोलिस स्टेशन शेगाव बू येथील एप्रिल महिन्यात चांगले काम करणारे ग्रेड psi पीरके साहेब आणि पोलिस अमलदार राकेश तुरांनकर यांना पुष्पगुच्छ , सन्मान पत्र आणि शिल्ड देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

Psi पीरके साहेब यांचे 31 मे रोजी हे पोलिस दलातून रिटायर्ड होणार आहे. तरी सुद्धा सुट्टी वर न घेता पोलिस स्टेशन चे काम करतात. सर्वांना कामात मदत करतात, जे जिम्मेदारी दिली ते पूर्ण व्यवस्थित पार पाडतात. त्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधक कार्यवाही केल्यामुळे गुन्हाचे प्रमाण कमी झाले आहे. 

तसेच पोलिस अमलदार राकेश तुरांनकर हे पोलिस स्टेशन ला सर्वांना मदत करतात. त्यांच्या कडे psi सरोदे साहेब यांचा लेखनिक म्हणून जिम्मेदारी असली तरी ते सर्वांचे काम करून त्यांना दिलेले कर्तव्य व्यवस्थित पार पाडतात