पुसद तालुक्याला वादळ वाऱ्याने झोपटले. गारपीट मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे लाखो चे नुकसान  Pusad taluka was hit by stormy winds. Hail and heavy rains caused loss of lakhs to farmers

Share News

✒️गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)

महागाव (दि.23 एप्रिल) :-

           यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पुसद तालुक्यांना वादळी वाऱ्याने झोडपले गारपिटासह मुसळधार पाऊस वातावरणातील बदल व निसर्गाच्या लहरीपणाच्या धरणापुढे शेतकरी हतबल व हताश झाला असून काल रात्री सायंकाळी अवेळी झालेल्या जोरदार हव्यासह झालेल्या मुसळधार पावसाने महागाव व पुसद तालुक्यात निसर्गाने रुद्र रूप धारण केल्याने ग्रामीण विभागात हाहाकार उडाला होता .

या गारपीट व मुसळधार पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाले ज्यामध्ये बाजरी ज्वारी टरबूज फळबाग आंबा या पिकाचे प्रचंड नुकसान होऊन होत्याचं नव्हतं झालं घरावरील पत्रे छप्पर उडाली व घराची पडझड झाली विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा पूर्णता खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .

या नैसर्गिक आपत्ती झालेल्या शेतमालाचे व घराच्या पडझडीचे तातडीने पंचनामे आटोपून एकही नुकसान ग्रस्त शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही यांची जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यावी व त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडे मागणी मनीष भाऊ जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे

Share News

More From Author

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावातील मुलांना शिक्षणाचे धडे Education lessons to village children during summer vacation

राळेगाव रेती घाटात निर्धारित उत्खननापेक्षा जास्त रेती उत्खनन Excavation of sand in excess of prescribed excavation in Ralegaon Sand Ghat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *