अवैध रेती उपसत असलेल्या दोन ट्रॅक्टर सह नऊ लाखाची मालमत्ता जप्त :आरोपी अटकेत Property worth nine lakh seized along with two tractors for illegal sand mining : Accused arrested

Share News

✒️शिरीष उगे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि 21 एप्रिल) : –

                 अज्ञात सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी टाकलेल्या रेती घाटावरील धाडीत दोन ट्रॅक्टर सह 9 लाख 25 हजाराची मालमत्ता जप्त करण्यात आली. यात पाच आरोपीवर कारवाई करण्यात आली. 

तालुक्यातील पिंपरी देशमुख येथील रेती घाटावर अवैधरित्या दोन ट्रॅक्टर रेतीचा उपसा करीत असल्याची माहिती ठाणेदार बिपिन इंगळे यांना मिळाली.ल त्यांनी आपल्या सहकार्यासह धाड टाकली असता त्या ठिकाणी रेती भरीत असलेल्या दोन ट्रॅक्टर सह इंडिगो गाडी अशी एकूण नऊ लाख 25 हजार रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली .

यातील आरोपी ट्रॅक्टर मालक सोहन बाकरे चिरादेवी ,संदीप नांदे पिपरी देशमुख, ट्रॅक्टर चालक प्रशांत माशिरकर 36 मांगली, प्रमोद मिटपल्लीवर 25 गौराळा, शुभम पुल्लरवार सूमठाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बाकरे हा फरार आहे.

Share News

More From Author

मच्छीमारी करणाऱ्या सभासदांचा संस्थेने जीवन विमा न काढल्याने मृतकाचे कुटुंब आर्थिक मदतीपासून वंचित The family of the deceased is deprived of financial support as the organization does not take out life insurance for the fishing members 

शेगाव येथील समाज बांधवांना भांडी वितरण ग्राम पंचायत चा उपक्रम  Panchayat distribution to the community members of Shegaon is an initiative of Gram Panchayat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *