पुर्व विदर्भात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खाते उघडले Shiv Sena (Uddhav balasaheab thakare) party account opened in East vidarbha

Share News

🔸वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे यांचे नेतृत्व

🔹शिवसेना( ऊध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे ग्रामपंचायत-आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून मोहन व्‍यंकटी भुक्या यांची अविरोध निवड

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.20 एप्रिल):-

          भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 मध्ये शिवसेना( ऊध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे ग्रामपंचायत-आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून मोहन व्‍यंकटी भुक्या यांची अविरोध निवड झाली. याच गटातील ईतर चार उमेदवार यांनी चुकीची माहीती सादर केल्यामुळे अपिलीय जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मोहन भुक्याच्या यांच्या बाजूने निकाल दे उर्वरीत चार ही उमेदवाराचे नामनिर्देशन अर्ज फेटाळत अपात्र केल.

यामुळेच उमेदवार मोहन भुक्या यांची अविरोध निवड झाली आहे. पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे, मा. संजयजी राऊत यांच्या आदेशाने वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली जात आहे.

मोहन भुक्या यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने,वरोरा भद्रावती विधानसभा समन्वय ज्ञानेश्वर डुकरे, चंद्रपूर जिल्हा महिला संघटिका सौ नर्मदा ताई बोरेकर,तालुकाप्रमुख तथा नगरसेवक नरेंद्र पडाल, प्रशांत भाऊ कारेकर माजी नगरसेवक ज्येष्ठ शिवसैनिक, वासुदेव ठाकरे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती.

शेतकरी मित्रमंडळाचे प्रमुख अनुप कुटेमाटे, उपसरपंच नंदोरी मंगेश भोयर, सरपंच मुधोली बंडू पाटील नन्नावरे, अध्यक्ष सरपंच संघटना प्रदीप महाकूलकर, माजी उपसभापती भद्रावती पंचायत समिती अश्लेशा भोयर प्रफुल ताजने कुचना, वैशिष्ठभाऊ लभाने, बाळापाटील मत्ते , अशोक मारेकर, धनराज भोयर, राजुभाऊ पारखी, सिध्दु पेटकर, संजय अतकरे, ठेवणे शकरभाऊ रासेकर, भारत वाढरे, धनराज रोडे, उपसरपंच विलास जिवतोडे, कालिदास उपरे, विजय खगार तसेच सर्व शिवसैनिक व कार्यकर्ते यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.

Share News

More From Author

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या  Youth committed suicide by hanging 

“व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल” विभागाच्या वरोरा तालुका  अध्यक्षपदी “आलेख रठ्ठे” यांची निवड Selection of “alekh ratthe” as warora taluka president of “voice of media digital” department

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *