आग लागून शेतातील “ड्रीप” साहित्य जळून खाक Burn the “drip”material in the field by fire

Share News

🔸शेतकऱ्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.20 एप्रिल) :- 

                 राजुरा तालुक्यातील चिंचोली(खुर्द)येथील शेतकरी बळीराम परशुराम काळे यांचे शेतात सिंचन करण्यासाठी ठेवलेल्या “ड्रीप” साहित्य आणि पाईप जळून खाक झाले.ही घटना बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.या आगीत ड्रीपसह शेतातील शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजुरा तालुक्यातील चिंचोली(खुर्द)येथील शेतकरी बळीराम परशुराम काळे यांचे चिंचोली_हिरापुर मार्गालगत शेत आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी बळीराम काळे यांनी सिंचनाचे ड्रीप साहित्य आणि पाईप टीनाचे शेडमध्ये शेतातच ठेवले होते.मात्र बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शेतातील साहित्याला अचानक आग लागली.

शेतात आग लागल्याची घटना माहिती होताच बळीराम काळे यांनी शेताकडे घाव घेतली.परंतु तोपर्यंत शेतातील ड्रीप साहित्य व सिंचनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पाईप आगीत जळून खाक झाले.या घटनेचा तलाठी सुनील रामटेके,कोतवाल चंद्रशेखर मादनेलवार यांनी शेतात घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून शेतकरी बळीराम काळे त्यांचे आगीत ४० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. 

रस्त्यालगत वाळलेल्या गवतावर विजेच्या जिवंत तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन आगीची ठिणगी पडून आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे शासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share News

More From Author

उष्माघाताने मजुराचा मृत्यू Death of laborer due to heat stroke

पोहायला जाणे महागात पडले  Going swimming became expensive 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *