भद्रावती येथील आयुध निर्माणी कॉलनीत पुन्हा एका इसमावर बिबट्याचा हल्ला A leopard attacked another isma in ordnance factory colony in bhadravati

Share News

🔸तिन वाघ जेरबंद करुनही दहशत कायम

🔹Despite the imprisonment of three tigers,the terror continues

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी) 

भद्रावती (दि.9 एप्रिल) :- शहरातील आयुध निर्माणी वसाहतीत फिरायसाठी गेलेल्या एका व्यक्तीवर एका बिबट्याने हल्ला करुन किरकोळ जखमी केल्याची घटना दिनांक 8रोज शनिवारला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान वसाहतितील अयप्पा मंदिर परिसरात घडली.विशेष म्हणजे पंधरा दिवसांपुर्वीच याच परिसरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते.आतापर्यंत वसाहतीत तिन बिबट्यांना जेरबंद करुनही वसाहतीत बिबट्याची दहशत कायम आहे.सदर व्यक्तीला वाचविण्यासाठी ज्ञमदतीस गेलेल्या अन्य एक व्यक्ती खाली पडल्याने त्याच्या हाताला फ्रैक्चर झाले आहे.वसाहतितील कार्टर नंबर 12डी टाईप 2 सेक्टर 4 मधे राहणारेज्ञरमेश गुप्ता वय 37वर्ष हे सायंकाळी फिरावयास गेले असता अयप्पा मंदिर परिसरात बिबट्याने त्यांचेवर हल्ला केला.त्यात ते किरकोळ जखमी झाले.धनंजय पांडे हे गृहस्थ त्यांना वाचविण्यासाठी गेले असता खाली पडून त्यांच्या हाताला दुखआपत झाली.

किरकोळ जखमी झालेल्या गुप्ता यांना ऊपचारासाठी चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.या परिसरात आता पर्यंत तिन बिबटे जेरबंद केल्याने वसाहतितील नागरिक बिनधास्त झाले होते. मात्र या घटनेने पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती जाणुन घेतली.

Share News

More From Author

शिवसेना (ठाकरे) गटाकडून  भद्रावती कृ. उ. बा.स. निवडणूक  प्रचाराचा शुभारंभ  Bhadravati kr from shiv Sena (thakare)group.a.b.s.election campaign begins

टवेरा व पिकअप ला अपघात  Tavera and pickup accident 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *