जनावर तस्करी करणाऱ्या ट्रक वर कारवाई  Action on animal smuggling trucks

Share News

🔸13 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर (दि.8 एप्रिल) :- अवैध गोवंश जनावरे वाहतुकी होत असल्याची मिळालेल्या गुप्त माहिती नुसार दि.08/04/23 रोजी रात्री 1:00 वा सुमारास मुल दिशेकडून गोंडपिंपरी जाणाऱ्या मार्गावर खेडी फाटा येथे नाकाबंदी करून मुल कडून येणाऱ्या कंटेनर आयशर ट्रक क्रं TS 12 UD 2780 थांबवले असता चालक पोलिसांना पाहून वाहन सोडून पळून गेला.

सदर ट्रक कंटेनर पाहणी केली असता कंटेनरमध्ये एकूण 36 गोवंश जातीचे जनावरे अत्यंत निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत दिसून आले. मिळून आलेले एकूण 36 गोवंश जनावरे किं 03 लाख 60 हजार रु व नमूद क्रमांकाचा आयशर ट्रक की. अं.10 लाख रू असा एकूण किं 13 लाख 60 हजार रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त गोवंश जनावरे ही गोशाळेत दाखल करण्यात आले आहेत. 

आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्री रवींद्र सिंग परदेशी साहेब,अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री आशिष बोरकर यांचे नेतृत्वात हवालदार दर्शन लाटकर, विशाल दुर्योधन, मोहन दासरवर यांनी केली.

गोवंश तस्करी करण्याकरिता तस्कर नवीन नवीन शकले लढवून तस्करी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.पोलिस स्टेशन सावली कडून अवैध गोवंश जनावरे तस्करीवर सतत प्रभावी कारवाया करण्यात येत असून भविष्यातही प्रभावी कारवाया करण्यात येतील.

Share News

More From Author

चिमूर कवडशी येथे १५ ला प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन Organized 15th enlightenment program at chimur kavadshi

शिवसेना (ठाकरे) गटाकडून  भद्रावती कृ. उ. बा.स. निवडणूक  प्रचाराचा शुभारंभ  Bhadravati kr from shiv Sena (thakare)group.a.b.s.election campaign begins

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *