प्लास्टिक झाकलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची शासनाला आली दया The primary health center covered with plastic has come to the mercy of the government

Share News

🔸 सरपंच नयन जांभुळे यांच्या प्रयत्नाला यश

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.4 एप्रिल) :- तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेल्या चंदनखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ग्रामपंचायती मार्फत प्लास्टिक झाकण्यात आले होते. काही कालावधीतच या बाबीची दाखल घेत १० लक्ष निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली आहे.

 तालुक्यातील चंदनखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य अशी इमारत आहे परंतु जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षित पणा मुले ही इमारत पावसाळ्याच्या दिवसात कवलेरू घरा पेक्षा ही जास्त गळते होती या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहभोवतालील 28 गावे येत असून या 28 गावांतील रुग्णांना सेवा देण्याचे काम या प्राथमिक आरोग्य केंद्रातून चालते परंतु पावसाळ्याच्या दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बिमार पडत होती. या प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहेर गावातील प्रसूतीची रुग्ण ही आणले जातात आणि कुटुंब नियोजनाचे रुग्ण इथेच आणले जातात.

पावसाळ्याच्या दिवसात सतत च्या पावसाने इमारत पूर्ण पने गळायला लागायची त्या मुळे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर चक्क प्लास्टिक झाकले होते. ह्या बाबी ची दाखल प्रशासन काही कालावधीत घेतली आणि इमारतीच्या दुरुस्ती साठी १० लक्ष निधी मंजूर करून इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्या मुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.

Share News

More From Author

नाट्य कलावंतांच्या प्रशिक्षणकरिता निधी देणार.. आमदार किशोर जोरगेवार Funds will be given for the training of theater artists..mla Kishore jorgewar

बारमाही टमाटर संशोधक भलमे यांना इस्राईल येथे अभ्यास दौरा Bhalme,perennial tamato researcher , on a study tour to israel

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *