नाट्य कलावंतांच्या प्रशिक्षणकरिता निधी देणार.. आमदार किशोर जोरगेवार Funds will be given for the training of theater artists..mla Kishore jorgewar

Share News

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.3 एप्रिल) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक हक्कामुळेच टोपल्या विकणाऱ्या आईचा मुलगा मुंबईच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचू शकला आज त्यांच्यामुळे मला वाटपाचा अधिकार मिळाला आहे.

याचा उपयोग सर्वसामान्य आणि बहुजनांच्या कल्याणासाठी करायचा आहे. दीक्षाभूमी येथे अभ्यासिकेसाठी आपण 1 करोड रुपये उपलब्ध करून दिले असून नाट्य कलावंतांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी देणार अशी घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

लोक जागृती संस्था तथा जय भीम सम्मेलन समिती चंद्रपूर द्वारा प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात प्रथम राष्ट्रीय जय भिम साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळूभाऊ धानोरकर, सिद्धार्थ हत्ती अंभोरे, अनिरुद्ध वनकर, प्रा. इसादास भडके, रावसाहेब कसबे ,अश्विनी खोब्रागडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पावलाने स्पर्श झालेल्या चंद्रपूर येथून राष्ट्रीय जय भिम साहित्य संमेलनाची सुरुवात होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे .नागपूर नंतर चंद्रपुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली त्यांनी दीक्षा दिलेल्या दीक्षाभूमीचा सर्व समावेश विकास व्हावा यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहे.

पहिल्याच अधिवेशनात आपण या दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावाही आपल्या वतीने सुरू आहे. नुकताच येथील अभ्यासिकेसाठी आपण एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे या कामाचे भूमिपूजनही संपन्न झाले आहे या अभ्यासिकेत एक लक्ष पुस्तकांचा संग्रह असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे याला 75 कोटी रुपयांचा निधी लागणार असून त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवर म्हणाले.

अनिरुद्ध वनकर हे बहुजन शक्ती एकत्रित करण्याचे काम करत आहे .त्यांना आमच्या शुभेच्छा असून यात शक्य ती मदत करण्याची तयारी असल्याचेही यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले. त्यांच्या राष्ट्रीय जय भिम साहित्य संमेलनाच्या संकल्पनेतून साहित्य क्षेत्राला नवी उंची मिळणार आहे कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे चंद्रपुरात सुरू होणारी परंपरा पुढे जात असते या साहित्य संमेलनाची सुरुवातही चंद्रपुरातून होत आहेत .

त्यामुळे या संमेलनालाही राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा यावेळी बोलताना आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली. कलावंतांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी येथे करण्यात आली ही मागणी अतिशय रास्त असून कलावंतांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी 25 लक्ष रुपये देणार अशी घोषणाही यावेळी आमदार जोरदार यांनी केली.

सोबतच चंद्रपूर ,गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यातील झाडीपट्टी कलावंतांना वाजवी दरात नाट्य प्रयोग सादर करता यावे यासाठी खुले मंच उभारण्यात यावे ही मागणी ही आपण केली असून त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे ते यावेळी म्हणाले यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतांचे गायन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती

Share News

More From Author

आपल्या हक्काचा माणूस विनोद भाऊ उमरे Vinod bhau umre,a man of our rights

प्लास्टिक झाकलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची शासनाला आली दया The primary health center covered with plastic has come to the mercy of the government

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *