✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.4 एप्रिल) :- जिल्ह्यातील चारगाव बू येथील सन २००८ मध्ये कृषी भूषण पुरस्कार प्राप्त श्री मधुकर चींधूजी भलमे यांनी पुन्हा एक नवीन प्रयोग करून शेतकरी बांधवासाठी एक आदर्श निर्माण केला आहे .
आपण पाहतो की टमाटर झाडाचा फळाचा कालावधी हा दोन ते तीन महिन्याचा असतो त्यात ४० ते ५० दिवसापर्यंत फळ टमाटर खायला मिळते परंतु श्री मधुकर भलमे यांनी आपल्या स्वतःच्या घरीच काही टमाटर झाडाची लागवड करून तंत्रज्ञानाचा वापर करून सण २०२० सतत फळ टमाटर देण्याचा देण्याचा कालावधी वाढण्यास सुरुवात झाली .
विशेष म्हणजे हे झाड आठ ते दहा फूट असून त्याला खांबाचा आधार देऊन उंच केले जाते तर हे झाड १२ महिने ते १४ महिन्या पर्यंत जिवंत राहत असून त्याला ८ , ९ , १० , १२ , महिन्या पर्यंत सतत फुल येऊन फळ लागतात व टमाटर मिळतात. त्यांच्या कडे असलेल्या झाळामुळे त्यांनी गेल्या तीन वर्षंपासून टमाटर ची खरेदी केलीच नाही व घराच्या झाडाच्या लागवडीतूनच घराच्या वापरण्यात येत असलेल्या भाजीत वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दर ९ ते १२ महिने टमाटर देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या उष्ण वातावरणात वार्षिक उत्पन्न देणारे ही नवीन बियाणे वान असून प्रत्येक शेतकऱ्याला याचा भरपूर फायदा होईल . शिवाय शेतमजुराला देखील याचा भरपूर लाभ होऊ शकतो ..
करिता याचा फायदा लाभ घेण्यासाठी तथा याची अधिक माहिती घेण्यासाठी किंव्हा बियाणे वान खरेदी करिता ९४२००८०८८७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती यावेळी श्री मधुकर भलमे यांनी दिली….
