रेशनिंग कार्ड काढून देतो म्हणून आदिवासी कुटुंबाची फसवणूक  Deception of tribal family as ration card is taken away 

Share News

🔸अखेर पंधरा दिवसांनी गुन्हा दाखल प्रेतांना मिळाला न्याय.

 ✒️सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.28 मार्च) :- इंदापूर तालुक्यातील निरगुडे गावामध्ये आदिवासी पारधी समाजाचे तीन प्रेत आपल्या स्वतःच्या जमिनीमध्ये दफन केले होते 

परंतू पीडित कुटुंब हरिदास किसन पवार यांची एक एकर जमीन म्हसोबावाडी चे सावकार नवनाथ पवार यांने आदिवासी समाजातील हरिदास पवार व मनोरुग्ण सिंदू हरिदास पवार यांचा अडानीपणाचा फायदा घेऊन पोलीसांची भिती दाखवून रेशनिंग कार्ड काढून देतो म्हणून त्यांच्या सह्या घेऊन त्यांना मिळालेले शासनाची एक एकर जमीन स्वतःच्या नावे करून घेतली.

व त्या जमिनीत हरिदास पवार यांचे वडील कै .किसन पवार व दोन आई असे तीन प्रेतांची थडगी काढून सावकार नवनाथ पवार यांने त्याच्यावर ऊस लावला आदिवासी पारधी समाजाच्या नियमानुसार या तीन प्रीताची सावकार नवनाथ पवार यांनी विटंबना केली होती. 

 सदर हकीकत पीडित कुटुंबाला समजल्यानंतर ते विचारण्यासाठी गेले असता नवनाथ पवार यांनी पीडित कुटुंबाला जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमानित वागणूक दिली व या विषयी कोठे वाचता केली तर गावात राहू देणार नाही अशा धमक्या पीडित कुटुंबाला दिली होती. आखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व साहित्यिक,नामदेव भोसले यांनी सदर घटणेची माहिती आदिवासी आयोग महाराष्ट्र राज्य व

 पुणे जिल्हाचे जिल्हा दंडाअधिकारी डाॅ राजेश देशमुख साहेब, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अनिकेत गोयल साहेब यांना दिली व बारामतीचे उपविभागीय पोलिस अधीक्षक गणेश इंगळे यांनी स्वतः या विषयात लक्ष दिल्यामुळे गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार, साहित्यिक. नामदेव भोसले आणि निरगुर्डे गावचे पोलीस पाटिल व गाव तलाटी ,ग्रामसेवक,कृषी अधिकारी,निरगुर्डे गावचे ग्रामस्थांच्या यांच्या ऊपस्तीत पंचनामा करुन अखेर पंधरा दिवसांनी गुन्हा दाखल झाला प्रेताला न्याय मिळाला..

जिवंतपणे गरीबीमुळे व्यवस्थेने जगुदिले नाही आणि मृत्युनंतर प्रेताला जागा ठेवली नाही आजदेखील महाराष्ट्रातील आदिवासी पारधी बांधवांना जीवंतपणे रहाण्यास गावामध्ये जागा दिली जात नाही शासकीय सुविधा दिल्या जात नाही आणि मृत्युनंतर प्रेत दफन करण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते हे चिंताजनक आहे असे मत साहित्यिक,नामदेव भोसले यांनी व्यक्त केले.

  या गुन्हातील आरोपी फरार आसुन सदर गुन्हाचा तपास पोलीस अधीक्षक अनिकेत गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे व सह्य पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पी एस आय रुपेश कदम,पोलीस हवालदार सचिन पवार तपास करत आहेत.

Share News

More From Author

परमानंद तीरानिक यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू तथा संशोधक प्रा. डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते नॅब चा राज्य पुरस्काराने सन्मानित Pramananad tiranik,vice -chancellor and researcher of uttar Maharashtra University prof.Dr.awarded the state award of ‘nab’ by Vijay maheshwari

चंद्रपूर जिल्हाचे पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना महिला सन्मान पुरष्कार अभिनेत्री गायिका मोनल कडलक यांच्या हस्ते  Journalist sneha uttam madavi of chandrapur district was given mahila sanman award by actress singer monal kadalak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *