परमानंद तीरानिक यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू तथा संशोधक प्रा. डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते नॅब चा राज्य पुरस्काराने सन्मानित Pramananad tiranik,vice -chancellor and researcher of uttar Maharashtra University prof.Dr.awarded the state award of ‘nab’ by Vijay maheshwari

Share News

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.27 मार्च) :- नॅशनल असोसिएशन फॉर द क्लाईड, युनिट महाराष्ट्र नाशिक तर्फे दिव्यांग दृष्टी बाधित शैक्षणिक क्षेत्रातील महाराष्ट्राच्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या व समाजामध्ये शासन स्तरावर स्वयंसेवी संस्था माध्यमातून जे डोळस शिक्षक शिक्षणाचे कार्य करतात त्यांना राज्य स्तरावर त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मानित केले जाते.

अंध वा दिव्यांग संवर्गाचे विद्यार्थी कुठेही मागे पडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करून नवनवीन उपक्रमाची ओळख दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून जोड देऊन शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक व मोजक्याच शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरविल्या जाते. यावर्षी महाराष्ट्रातून शेकडो शिक्षकांचे प्रस्ताव होते.

त्या सर्वांचे प्रेझेन्टेशन जिल्हा माहिती कार्यालयांअतर्गत केल्यानंतर त्यातील नावीन्यपूर्ण प्रयोग केलेल्या शिक्षकांनी बाजी मारली. त्यात महाराष्ट्रातील एक प्राध्यापक व चार शिक्षकांची अतिशय पारदर्शकपणे निवड करण्यात आली त्यात विदर्भातून एकमेव चंद्रपूर जिल्ह्यातील आनंद अंध विद्यालय आनंदवन येतील कलाशिक्षक परमानंद तीराणीक यांच्या निवडीने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .

हा पुरस्कार विवरण सोहळा मोठ्या थाटामाटात महाराष्ट्राचे लाडके ज्ञानपीठ प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती पर्वानिमित्त तसेच नॅबच्या 25 व्या रौम्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त पद्मश्री बाबुभाई राठी माईस सभागृह नाशिक येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. डॉ. विजयजी लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांच्या शुभहस्ते परमानंद तीराणीक यांचा सह पत्नीक रुक्मिणी शाल श्रीफळ गुलाब पुष्प सुवर्णपदक सन्मानचिन्ह व मानपत्र आणि रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन राज्यस्तरीय आदर्श डोळ्यास शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. रामेश्वर कलंत्री, अध्यक्ष नॅब महाराष्ट्र आणि उपाध्यक्ष नॅब इंडिया मुंबई, मा. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, चेअरमन पुरस्कार समिती नाशिक ,के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर चे डीन मा. प्रा. डॉ. कुटे, मा. गोपी मयूर तर प्रमुख अतिथी म्हणून सिईओ प्राचार्य डॉ.अश्विनकुमार भारद्वाज, संपतजी जोंधळे समिती सचिव, इतिहास संशोधक प्रा. डॉ. अमिधा धुमटकर मुंबई, महाराष्ट्रातील पहिली दृष्टी बाधित जिल्हाधिकारी प्रांजल कोमलसिंग पाटील, यांची उपस्थिती होती.

यावेळी पुरस्कार वितरण सोहळा व तेजोमयी प्रवास स्मरणिकातील पुरस्कार प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या विशेष कार्य गौरवासाठी आदर्श ठरलेल्या प्राध्यापक शिक्षक व संस्था यांचा यथोचित सन्मान प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले

Share News

More From Author

अ. भा.ग्रामीण पत्रकार संघाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी गठीत A.chandrapur district executive committee of indian Grameen journalists association

रेशनिंग कार्ड काढून देतो म्हणून आदिवासी कुटुंबाची फसवणूक  Deception of tribal family as ration card is taken away 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *