जुगार खेळताना सरपंचासह इतर आरोपी अटक  Sarpanch and other accused arrested while gambling

Share News

🔸शेगांव पोलिसांनी केली अटक

🔸Shegaon police made an arrest

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव(दि.25 मार्च) :- येथून जवळच असलेल्या सालोरी येथे अनेक दिवसापासून जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जात असल्याची गुप्त माहिती येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांना मिळताच विशेष सापळा रचून आपले पोलीस अधिकारी यांना गुप्त माहितीच्या आधारे जुगार खेळत असताना येथील नागरिकांना रंगेहाथ पकडण्यात यश प्राप्त झाले.

तर यात आरोपी दिनेश जिवतोडे, अविनाश नन्नावरे, सचिन ढोणे , विजय डांगे , जीवन दास बावणे , जनार्दन मोरे , विलास सेलवटकर, रमेश सेलकर, शरद सेलकर , महेंद्र निखाडे, बाळकृष्ण चौधरी , इत्यादी आरोपीला जुगार खेळताना अटक करण्यात आली . 

    सदर ही कारवाई ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री भीमराव पडोळे ,पोलीस शिपाई देवा डुकरे , पूर्शोत्तम बरडे , व अन्य पोलिसांनी मोठी मोलाची कामगिरी बजावली.

सरपंच हा गावांचा कारभारी असतो व त्यांच्या सल्ल्यानेच गावांतील सामाजिक व्यवस्था चालत असते पण तो गावांचा कारभारीच जुगार भरवत असेल व स्वतः खेळत असेल तर त्या कारभाऱ्याचा कारभार किती चुकीचा व भ्रष्ट असेल ? याचा विचार न केलेलाच बरा. अशीच एक घटना वरोरा तालुक्यातील सालोंरी या गावांत घडली असून या गावांचा करभरि सरपंचच जुगार खेळताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून त्यांच्यासह तब्बल चौदा जुगारांना शेगांव पोलिसांनी अटक केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

सालोरी गावाचे सरपंच बावणे हे गावाच्या एका व्यक्तीच्या घरी जुगार भरवून खेळत असल्याची माहिती शेगांव पोलिसांना माहिती होताच त्यांनी त्या घरांवर आज दिनांक 25 ला दूपारी 12.30 च्या दरम्यान धाड टाकून मुद्देमालासह चौदा आरोपींना अटक केली. दरम्यान सरपंच बावणे यांना अटक झाल्यामुळे गावांत वातावरण गरम झालं असल्याचं बोलल्या जातं आहे.

Share News

More From Author

भद्रावती तालुक्यात चोराचा धुमाकूळ सुरूच  Thief rampage continues in Bhadravati taluka

पुरस्काराने नवीन ऊर्जा प्राप्त होत असते- प्रकाश मेश्राम Award brings new energy – prakash mesharam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *