मार्निंग वॉकला निघालेल्या इसमावर बिबट्याचा हल्ला

Share News

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 चंद्रपूर (दि.21 मार्च) : -भद्रावती तालुक्यातील गेल्या महिण्याभरात शहरातील आयुध निर्माणी परिसरातील दोन बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केल्यानंतरही परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.सकाळी मार्निंग वाकला निघालेल्या वसाहतितील एका पंचेचाळीस वर्षीय इसमावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले.

सदर घटना दिनांक 21रोज मंगळवारला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वसाहतीत घडली.या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे.सुरेंद्रसींग चव्हाण असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. सुरेंद्रसींग चव्हाण हे आपल्या डिएससी येथील कार्टरमधून सकाळी नेहमीप्रमाणे मार्निंग वाकला निघाले असता वसाहतितील मुख्य रस्त्यावर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मोठ्या हिंमतीने त्यांनी या बिबट्याचा प्रतिकार करीत स्वतः ची सुटका केली.

त्यांना वसाहतितील निर्माणी च्या दवाखाण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला व पाठीला जखमा झाल्या. या  घटनेची माहिती मिळताच भद्रावती वनपरिक्षेत्राचे अधिकारी एच. पी. शेंडे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळ गाठून घटनेची माहिती जाणुन घेतली व पंचनामा केला. एक महिण्या अगोदर याच वसाहतीत फिरायला निघालेल्या एका महिलेवर एका बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती.

त्यानंतर या परिसरातून दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले होते. त्यावेळी वसाहतितील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र या घटनेने परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबटची जेरबंद कारण्याची मागणी नागरिकांनी केली.

Share News

More From Author

श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य शिबीर Shrdheya baba amte arogya abhiyaan arogya camp

विविध मागण्यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सचिन उबाळे यांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन Sachin ubale,district organizer of swabhiman farmers association,gave a statement to the chief minister for various demands

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *