मनसेच्या वर्धापन दिनी अनोखा सत्कार समारंभ A unique felicitation ceremony on the anniversary of mns

Share News

🔸साहित्यिक, कलावंत व समाजसेवी यांच्या सत्काराने सामाजिक मन भारावलं

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.12 मार्च) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसांसाठी लढणारी राजकीय संघटना असून मराठी कलावंत, मराठी साहित्यिक व समाजकार्यात वाहून घेतलेल्या लढवय्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते, त्यातच मनसेचा वर्धापन दिन असला की त्या निमित्याने अशा कर्तुत्ववान प्रभुतींचा गौरव पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जातो.

त्यामुळे तो वारसा जपण्यासाठी मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा येथील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जेष्ठ साहित्यिक तथा झाडीबोली साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ना. गो. थुटे, श्रध्येय बाबा आमटे यांचे सहकारी व दोन्ही पायाने अपंग असताना अंध व अपंग कलावंत असणाऱ्या आर्केस्ट्राचे संयोजक सदाशिव ताजने व कोरोना काळात ज्यांनी शेकडो लोकांचे प्राण वाचवून अविरत सेवा दिली ते वरोरा येथील प्रख्यात डॉक्टर हेमंत खापने यांचा सत्कार करून जनसामान्यांच्या मानाचा वेध घेतला. 

वरोरा येथे प्रख्यात साहित्यिक ज्यांची जवळपास ४९ पुस्तके प्रकाशित झाली व त्यांच्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीचा वेध घेणाऱ्या साहित्यिकांनी जवळपास त्यांवर १४ पुस्तके प्रकाशित केली तर एका व्यक्तीने त्यांच्या साहित्यावर पीएचडी केली असे जेष्ठ साहित्यिक व मराठी झाडीबोली साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ना. गो. थुटे यांचा सत्कार त्यांच्या कलासदन ग्रंथालयात करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना त्यांनी आपल्या घराचे नाव आविष्कार आहे आणि आविष्कार म्हणजे नवनिर्माण त्यामुळे आपल्या पक्षाला समर्पित नाव असल्याने आपल्या लोककल्याणकारी कामात माझा नेहमीच वाटा असेल असे आश्वासन व मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद दिले. 

पद्मश्री स्वर्गीय बाबा आमटे यांच्या सोबत व त्यानंतर सुद्धा आनंदवनात दोन्ही पाय नसताना आपली प्रचंड मेहनत आणि आपलं जीवन समर्पित करणारे व ज्यांना मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी भेट देऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला त्या आर्केस्ट्राचे कलावंत सदाशिव ताजने यांचा सत्कार त्यांच्या आनंदवन येथील घरी जावून मनसे पदाधिकाऱ्यांनी केला त्या सत्काराला भारावून जावून त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद दिले व आपण जनतेच्या समस्या घेऊन लढा असे आवाहन केले. 

मागील दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात जिथे वरोरा तालुक्यातील अनेक नामवंत डॉक्टर्स घरी बसले होते त्या कठीण काळात जनतेच्या सेवेत स्वतःला झोकुन देणारे प्रख्यात डॉक्टर हेमंत खापने यांचा सुद्धा मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या रुग्णालयात जावून केला. 

मनसेच्या वर्धापन दिनी साहित्यिक, कलावंत व समाजसेवी विभुतींचा सत्कार करण्यात आला तो सत्कार खऱ्या अर्थाने सामाजिक द्रुष्टीने महत्वपूर्ण असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे अशी प्रतिक्रिया सत्कारमूर्तींनी दिली. यावेळी उपस्थित 

सुधीर खापने महाराष्ट्र सैनिक, राजू कुकडे जिल्हा उपाध्यक्ष, विनोद सोनटक्के जिल्हा सचिव, रेवती इंगोले मनसे महिला तालुका अध्यक्ष, अनिता नकवे, शहर उपाध्यक्ष, प्रतीक मुडे प्रशीद्धी प्रमुख, प्रकाश धोपटे शहर विभाग अध्यक्ष इत्यादींची उपस्थिती होती.

Share News

More From Author

शिवाजी महाराजांचे विचार गावा गावात पोहचविणे काळाची गरज- प्रदीप महाकुलकर It is the need of the hour to bring the thoughts of shivaji maharaj to every village – pradeep mahakulkar

चरुर (धा) येथील घरगुती वादग्रस्त प्रकरणाची त.मु.स.अध्यक्ष मनोहर हनवते चंदनखेडा यांनी घेतली दखल. A domestic dispute case in charur (DHA).s.presdient manohar hanwate chandankheda took it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *