भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे नविन संचालक मंडळ अविरोध

Share News

🔹शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे तथा मित्रपरिवार यांचे नेतृत्व

 ✒️मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती (दि.13 फेब्रुवारी) :- स्थानिक विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या गाजलेल्या विजयानंतर येथील रवींद्र शिंदे वरोरा-भद्रावती शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नेतृत्वात भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक अविरोध झाली.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील नियम १९(४) नुसार भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२२-२३ ते २०२७-२८ साठी संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम दिनांक ६ फेब्रुवारी पासून जाहीर झालेला होता. या निवडणुकीत संचालक मंडळाकरीता नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. या नामनिर्देशन प्रक्रियेत एकही अर्ज विरोधात न आल्याने अविरोध संचालक मंडळ निवडून आले.

सदर निवडणूक प्रक्रिया ही शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे तथा मित्रपरिवार यांचे नेतृत्वात निवड झालेल्या संचालक मंडळाने राबविली. तरुण व ज्येष्ठ मंडळींची सांगळ घालून नविन कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

नवनियुक्त संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून विनोद वामनराव पांढरे, राजेश नामदेवराव मत्ते, विनोद दादाजी घोडे, प्रशांत मनोहरराव कारेकर, अण्णाजी जनार्दन लांबट, विवेकानंद जनार्दन पारोधे, विमुक्त जाती/जमाती गटातून राजेंद्र वसंतराव धात्रक, महिला राखीव गटातून वर्षा राजेश ठाकरे, शालुताई विकास आसुटकर, अनुसूचित जाती/जमाती गटातून बंडू देवाजी नन्नावरे, इतर मागासवर्ग गटातून ज्ञानेश्वर राजाराम डुकरे यांची अविरोध निवड झाली आहे.

या पतसंस्थेची माननीय बळवंतदादा गुंडावार, शरद जीवतोडे, नामदेवराव मत्ते, चंद्रकांत गुंडावार यांनी स्थापना केली. तिला पुढे यशस्वी वाटचाल करण्याकरीता रविद्रं शिदे यांचे नेतृत्वात स्व. जनार्दन पारोधे यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या कारकिर्दीत पतसंस्था विकसित झाली. फेब्रुवारी २०२१ मधे त्यांचे निधन झाले. या पतसंस्थेशी जुळलेले ज्येष्ठ सहकारयात्री यांनी पतसंस्थेच्या विकासाकरिता सतत कार्य केले.

वित्तीय संस्थेचा कार्यभार हा फार काटेकोर व नियमांचे तंतोतंत पालन करुन करावे लागते ही फार मोठी जवाबदारीचे काम आहे. लहान मोठे व्यापारी व संस्थेचे सभासद यांची जमा पुजी ठेवीच्या रुपात संस्थेत असते दिलेले कर्ज वेळेत वसुल करण्याची जवाबदारी सस्थेच्या विश्वस्त मंडळांची असते ही जवाबदारी मागील १५ वर्षापासून संचालक मडळाने चागल्या रितीने पार पाडली त्यामुळे संस्था ही नफ्यात असुन लेखापरिक्षण वर्ग “अ“ प्राप्त आहे. या संपुर्ण बाबीचे पालन करुन पतसंस्थेला आर्थिक विकासाच्या उच्चांकावर घेवून जाण्याचा मानस विद्यमान संचालकांचा राहील, असे रवींद्र शिंदे संचालक मंडळाच्या वतीने यावेळी म्हणाले.

निवडणूक निर्णय अधिकारी, तालुका नागरी सहकारी पतसंस्था मर्या., भद्रावती तर्फे पारदर्शक व चोख पध्दतीने सदर निवड प्रक्रिया राबविली.

Share News

More From Author

घराचे खोदकाम करीत असताना सापडली पुरातन कृष्णाची मूर्ती

माजरी कॉलरी ओपणकास्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर कामगार विकास परिवर्तन पैनलचा विजय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *