घराचे खोदकाम करीत असताना सापडली पुरातन कृष्णाची मूर्ती

Share News

🔸भक्तांना दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी

🔹मूर्ती दुर्लभ असल्याची जाणकारांची माहिती

✒️चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 चंद्रपूर (दि.12 फेब्रुवारी) :- ब्रम्हपुरी शहराला लागून असलेल्या मौजा खेड येथे गजानन मानकर यांचे नवीन घराचे बांधकामच्या गड्ड्याच्या खोदकामात पुरातन कृष्णाची मूर्ती सापडल्याने सर्वत्र आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे.

     ब्रम्हपुरी शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर ब्रम्हपुरी खेड रस्त्यावर खेड गावाच्या अगदी सुरवातीला गजानन शिवा मानकर यांचे जुने घर आहे.मानकर यांनी जुन्या घराला लागूनच नवीन घराचे बांधकाम सुरू केले आहे. काल दिनाक 11 फेब्रुवारीला नवीन घराचे बांधकामाच्या लगत नवीन शोचालयाच्या खड्ड्याच्या खोदकाम दरम्यान अंदाजे 7 ते 8 फुटावर पुरातन कृष्णाची मूर्ती आढदून आली.सापडलेली मूर्ती ही फार पुरातन असून पांढऱ्या रंगाच्या एकाच दगडावर कोरलेली असल्याचे दिसत आहे.

           शिवा मानकर याने घराच्या खोदकाम मध्ये सापडलेली कृष्णाच्या मूर्ती ही खूप दुर्लभ असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत असून अशा प्रकारचे एकाच पांढरा रंगाचे दगडावर कोरीव काम असलेली मूर्ती ब्रम्हपुरी शहर व आजूबाजूच्या परिसरात अद्याप पहिली नसल्याचे जाणकार सांगत आहेत. प्रशासनाने या दुर्लभ मूर्तीची पुरातन विभागाकडून तपासणी केल्यास मूर्ती किती पुरातन आहे हे लक्षात येईल.

Share News

More From Author

प्रेम संबंधातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे नविन संचालक मंडळ अविरोध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *