हिपँटायटीस (कावीळ) व एचआयव्ही,गुप्तरोग तपासणी जनजागृती शिबीर

203

🔸समुपदेशना द्वारे दिला विविध आजारा वरती मोफत आरोग्य सल्ला

 मनोज कसारे भद्रावती (Bhadravti प्रतिनिधी)

भद्रावती (दि. 22फेब्रुवारी) :-  राष्ट्रीय आरोग्य अभियान,महाराष्ट्र अंतर्गत राष्ट्रीय व्हायरल हिपँटायटीस (कावीळ) नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर व संकल्प बहुउद्देशिय ग्राम विकास संस्था द्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येरूर ता. चंद्रपूर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे *हिपँटायटीस (कावीळ) व एचआयव्ही,गुप्तरोग तपासणी शिबीर* घेण्यात आले. यावेळी उपस्थित गावकरी यांना हिपँटायटीस (कावीळ) व एचआयव्ही,गुप्तरोग, क्षयरोग आजारा संदर्भात माहिती देण्यात आली.

शिबिराला ग्रामसेवक मा.भावना निकोडे, सरपंच मा. प्रियंका मडावी, उपसरपंच मा.सुनीता वडस्कर, ग्रामपंचायत सदस्य श्री. विजय बलकी, लिंक वर्कर प्रकल्पाचे डीआरपी रोशन आकुलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा भंडारी,आयसीटीसी समुपदेशक शारदा लोखंडे,झोनल सुपरवायझर रुपाली मडावी, एम अँड ई मयूर घरोटे, लिंक वर्कर छाया साळवे, कोमल भोयर, आशा वर्कर संगीता आसकर यांची उपस्थिती होती. शिबिरात मधुमेह, रक्तदाब तपासणी करून एचआयव्ही व हिपेटायटीस बी व सी,आरपीआर,थायरॉईड, केएफटी, एलएफटी,हिमोग्लोबिन, सीबीसी, तपासणी साठी 97 रक्त नमुने संकलित करण्यात आले.

शिबीरात हिपेटायटीस, एचआयव्ही,गुप्तरोग व क्षयरोग आजारावर माहिती पत्रकाचे वाटत करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. सुमंत पानगंटीवार, राष्ट्रीय व्हायरल हिपँटायटीस (कावीळ) नियंत्रण कार्यक्रमाच्या समन्वयक ईश्वरी जुमडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.प्रशांत मजगवळी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.