महाशिवरात्री निमित्त भटाळा येथे होणार शिवभक्तांची अलोट गर्दी

🔸हर हर महादेव च्या गजराने भटाळा नगरी गजबजनार 

🔹शेगाव पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

✒️ आम्रपाली गाठले (शेगाव बू प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.17 फेब्रुवारी) :- चंद्रपूर जिल्हात सुप्रसिद्ध असलेले भटाळा येथील भोळ्या शंकराचे प्राचीन मंदिर असून हे मंदिर पुरातन काळातील असून यात जगात सर्वात मोठी शिवलिंग पिंड विराजमान आहे शिवाय येथील मंदिर सर्वात मोठे असून याची इतिहासात नोंद आहे .

भटाळा हे शिल्पग्राम गाव म्हणून विशेष ओडखले जाते या गावात पांढऱ्या शुभ्र दगडाची खान असून येथे पुरातन काळातील भवानी मातेचे मंदिर आहे तसेच ऋषी तलाव , अनेक शिल्प , अनेक ठिकाणी विराजमान आहे . त्यामुळे हररोज या गावात अनेक पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात .

      तर दरवर्षी येथे महाशिवरात्री शुभ मुहूर्तावर भटाळा येथील भोळ्या महादेव मंदिरात महाशिवरात्री दिवसापासून तीन दिवसीय भव्य यात्रा भरत असून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अनेक भाविक भक्त या ठिकाणी नतमस्तक होतात… शिवाय हे मंदिर पावन असल्याने परिसरातील जनतेचे श्रद्धा स्थान आहे त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्रीच्या पावण पर्वावर महादेवाचे गाणे गात अनेक शिव भक्त येथे येत असतात .

महाशिवरात्री महोत्सव दरम्यान चालणाऱ्या तीन दिवसीय यात्रेमध्ये स्थानिक ग्राम पंचायत यांची मोठी मोलाची कामगिरी असते शिवाय महादेव मंदिर चे पदाधिकारी यांची अधिक मोलाची कामगिरी असून येणाऱ्या भाविकांसाठी सुख सोय उपलब्ध करून देण्यात येत असते . 

 भटाळा हे गाव विशेष म्हणजे शेगाव पोलीस स्टेशन शेगाव बू . हद्दीत येत असलेल्या स्थानिक शेगाव चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी आज या संपूर्ण परिसराची पाहणी करून येणाऱ्या भाविकांची गैरसोय न व्हावी या करिता CCTV कॅमेरा प्रस्तापित केले तसेच यात्रमध्ये येणाऱ्या महिला पुरुष यांना कसलाही त्रास होणार नाही या करिता पोलीस शिपाई श्री देवा डुकरे यांच्या नेतृत्वाखाली चौका चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे ठाणेदार मेश्राम यांनी सांगितले.