शिक्षकाचा कृतज्ञता सोहळा 

237

🔸गुरू शिक्षकाचे नाते अतूट असते … विनोद चिकटे 

✒️ शेगांव बू(विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 शेगाव बू (दि.6 फेब्रुवारी) :- शिक्षक आणि गुरू यांचे नाते सदैव अतूट असते हे तितकेच सत्य आहे अखेर गुरू हा गुरूच असतो शिष्य हा शिष्यच असतो . शिष्य हा कितीही मोठा झाला देखील तो गुरूचा दर्जा घेऊ शकत नाही .विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य तसेच विद्यार्थी मडक्या प्रमाणे घडविण्याचे मोलाचे कार्य गुरू करीत असून त्यांचे आई वडील हे मोलाचे कार्य करीत असतात.म्हणून का गुरूला विसरायचं का. नाही गुरू ला विसरून चालणार नाही गुरूचे ऋण हे मरे पर्यंत असते .

करिता काहिका ना आसो त्याचे ऋण फेडण्यासाठी हा शिक्षकाचा कृतज्ञता सोहळा सेवा निवृत्त श्री विनोद चिकटे यांनी आयोजित केला होता.. तर यात कन्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री विनोद चिकटे शिक्षक यांना सेवा निवृत्ती पर कृतज्ञता सोहळा कार्यक्रम प्रसंगी यांचा या कार्यक्रमा प्रसंगी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी श्री चिकटे शिक्षक यांना शिकविणारे शिक्षक त्यांचे गुरू मा.श्री . मदन ठेंगणे , विठ्ठल सोनेकर , कळसकर शिक्षक , श्री मिसाळ , श्री टोंगे सर , घडले सर , प्रकाशपंत पदमावर , धनराजजी आस्वले, दिलीपराव धोबे , इत्यादी त्यांच्या गुरूचा सत्कार करण्यात आला. त्याच सोबत त्यांनी शिकलेल्या शिष्यांनी देखील त्यांचा सत्कर केला . शेगाव परिसरात हा शिक्षकाचा आगळा वेगळा कार्यक्रम असल्याने सर्वांना हा कार्यक्रम प्रेरणा देणारा ठरला.