कॅन्सर विषयी महिलांना जन जागृती

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 वरोरा (दि.5 फेब्रुवारी) :- उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कॅन्सर दिनाचे उद्घाटन जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमाला डॉ. खुजे ,डॉक्टर दारुंडे तसेच डॉ. पिंपळकर व स्त्री रोग तज्ञ डॉक्टर गेडाम रूग्णालयाच्या अधिसेविका सौ वंदना विनोद बरडे , परीसेविका कापटे व अधीपरिचारिका मिना मोगरे व ईतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सौ .वंदना बरडे अधीसेविका मॅडम यांनी प्रास्ताविक केले आणि आपल्या जीवनातील दोन काॅन्सर ग्रस्त रुग्णाविषयी माहीति दिली.तसेच मानसिक स्वास्थ्य ढळु नये यासाठी मनानें खंबिर राहावे असे आवाहन केले.

सविस्तर काॅन्सरची माहिती दिली व त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.डाॅ खूजे जनरल सर्जन,डाॅ गेडाम स्त्रीरोग तज्ज्ञ,डाॅ दारूंडे , डॉ पिपळकर यांनी मार्गदर्शन केले तसेच उपस्थित कर्मचारी वर्ग व एनसीडी ची चमू यांच्या उपसथितीमध्ये विविध कर्करोगाच्या प्रकाराविषयी माहिती देऊ जनजागृती पर कार्यक्रम घेऊन. तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली.व सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी कर्क रोगांची जनजागृतीचि शपथ दिली.

नेहा ईदुरकर यांनी सूत्रसंचालन केले.आभारप्रदर्शन मिना मोगरे यांनी केले. कार्यक्रमासाठी किरण धांडे, तनिष्का खडसाने लक्षमिकांत ताले चन्द्रशेखर समुद्रे , कूंदा यांनी मेहनत घेतली.तसेच महीन्याच्या पहील्या शनिवारी स्वच्छता दिवस पाळण्याचे सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी सांगितले .