नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव येथे स्नेहसंमेलन संपन्न 

✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

   शेगाव बू (दि.3 फेब्रुवारी) :-  नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव येथे दि. 20 ते 27 जानेवारी 2023 दरम्यान स्नेहसंमेलन संपन्न झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तर समारोपाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री कहुरके सर यांनी भुषविले.

स्नेह संमेलनात सांगीक खेळ कबड्डी, वयक्तीक खेळ मध्ये गोळा फेक, संगीत खुर्ची, चमचा गोळी, तिन पायाची दौड व मुला मुलीचे डान्स ईत्यादी. कार्यक्रम घेण्यात आले. या सर्व कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षक गजभे सर, श्री बागेसर सर, श्री बंडुभाऊ कोटकर श्री श्रीकांत तलसे श्री मनोज बोंदगुलवार ईत्यादी होतेे

. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक ढाकुणकर सर यांनी संचालन सौ हिवरकर मॅडम व श्री वारे यांनी व आभार कु. हटवार मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्नेहसंमेलन प्रमुख श्री मत्ते सांस्कृतिक प्रमुख सौ वरभे क्रीडा प्रमुख श्री सोनवाने, बौद्धिक स्पर्धा प्रमुख श्री शंभरकर, विविध स्पर्धा प्रमुख श्री चांगले, श्री खेडीकर श्री गिरडे, श्री कडुकर, श्री उरकुडे, जुमडे कु आसुटकर श्री झाडे, श्री खिरटकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.