शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख पदाच्या नियुक्त्या

Share News

🔹अखेर कोण कोण पदाधिकारी 

🔸वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांचे नेतृत्व

 ✒️मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (दि.8 जानेवारी) :- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 

वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख पदी रवींद्र शिंदे यांची नियुक्ती होताच पक्षात नवचैतन्य संचारले आहेत. ज्येष्ठ व युवा शिव सैनिकांना सोबत घेवून त्यांचे कार्य सुरू झाले आहे. त्यांच्या नेतृत्वात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षातर्फे प्रमुख नियुक्त्या होत आहेत. 

उपजिल्हाप्रमुख पदावर भास्कर लटारी ताजने (वरोरा भद्रावती विधानसभा) व तालुकाप्रमुख पदावर दत्ता बबनराव बोरेकर (वरोरा तालुका) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे दोघे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ शिवसैनिक असुन भास्कर ताजने यांनी यापूर्वी तालुका अध्यक्ष पदावर काम केले आहे व कट्टर शिवसैनिक आहेत. ताजने यांचा राजकारणावर गाढा अभ्यास आहे. तर दत्ता बोरेकर हे वरोरा तालुक्यातील खांबाळा शिवसेना शाखेच्या स्थापनेपासून म्हणजे १९९० पासून वरोरा तालुक्यात व जिल्ह्यात शिवसेनेचे अविरत कार्य करीत आहे. या दोघांच्याही कारकीर्दीत विविध जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, बाजार समिती, सहकारी संस्था तथा पक्षाचा आमदार निवडून आणण्यात यांना यशप्राप्त आहे.

या नियुक्ती बद्दल पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे, खासदार संजयजी राऊत, खासदार अनिलजी देसाई, खासदार विनायकजी राऊत, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाशजी वाघ, पुर्व विदर्भ महीला संघटक व प्रवक्ता सौ. शिल्पाताई बोडके, जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतजी कदम, विभागीय युवा सेना प्रमुख हर्षलजी काकडे, अजयजी स्वामी यांचे विशेष आभार मानण्यात आले आहे.तर वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, जिल्हा महीला संघटीका नर्मदा बोरेकर, ज्येष्ठ शिवसैनिक खेमराज कुरेकार आदींनी अभिनंदन केले आहे.

शिवसेनेच्या विचारांचे पाईक तसेच हिन्दुहदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना पक्षाचे अंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे धोरण घेवुन व जनता जनार्दनाच्या सतत सेवेत असलेल्या जुन्या-नव्या शिवसैनिकाना जनमानसात कार्य करणाऱ्या शिवसैनिकाना जवाबदारी भविष्यात देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

जिल्हापरिषद गट तेथे विभागप्रमुख, पंचायत समिती गण तेथे उपविभाग प्रमुख, ग्रामपंचायत तिथे शाखाप्रमुख, एक हजार ते आठशे मतदार तिथे बुत प्रमुख, आणि बीएलऐ गटात-गणात व ग्रामस्थान मध्ये जाऊन संवेदनशिल गावागावात जाऊन शिवसेना पक्ष संघटन, तथा उध्दवजींचे विचार गावागावात घराघरात पोचवून स्थानिक लोकांबरोबर विचार विनिमय करून त्यांच्या मधूनच पदाधिकाऱ्यांच्या नेमणुक अभियान राबविण्यात येणार आहे. या वेळी गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक गट-गण-ग्रामपंचायत मध्ये पदनियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share News

More From Author

उत्तम आरोग्य हीच खरी धन संपदा.सौ.वंदना बरडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *