पत्रकारांनी सामाजिक व व्यवहारिक नितीमुल्य जोपासणे आवश्यक- सुरेश डांगे

🔹साप्ताहिक लोक प्रतिष्ठाचे लोकार्पण सोहळा

✒️चिमूर ( विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर (दि.25 जानेवारी):-  पत्रकारीता समाजसेवेचा भाग असला तरी त्याला आता व्यवसायाचे स्वरूप आले आहे. एवढेच नव्हे तर विद्यापीठात सुध्दा पत्रकारिता पदवीचा समावेश व्यवसाय शिक्षणात केला आहे. वर्तमान काळात पत्रकारिता व्यवसाय अस्थिर होत असताना लोक प्रतिष्ठा सारखे वृत्तपत्र नव्याने सुरु होणे. ही समाधानाची बाब आहे. पत्रकारिता करीत असताना पत्रकारांनी सामाजिक भान व नितीमुल्य जीवासवण्याचा प्रयत्न करावा.

नविन युगात वर्तमानपत्राची जबाबदारी वाढली असून समाजाला न्याय देण्याचे अवघड कार्य आज संपादक-पत्रकारांना करावे लागत आहे आणि हे करताना काही सामाजिक पथ्य सुध्दा आपल्याला पाळायचे आहेत असे प्रतिपादन सामाहिक पुरोगामी संदेशचे संपादक सुरेश डांगे यांनी व्यक्त केले. लोक प्रतिष्ठा साप्ताहिकाचे लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. चिमुर येथील आदर्श विद्यालय वडाळा-चिमुर येथे नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला.

पत्रकारांची भूमिका समाज व शासनाला जोडणारी असावी आणि वर्तमानपत्र सामाजिक भावना जोपासणारे असावे. पत्रकारांनी सामाजिक भावना जोपासने आवश्यक असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात अॅड. ज्ञानेश्वर नागदेवते यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता गजानन बुटके यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणुन चिमूर तालुका प्रेस असोशिएशनचे अध्यक्ष चुनीलाल कुडवे, मुख्याध्यापक संजय नैताम, सामाजिक कार्यकर्ता श्रीहरी सातपुते, पुरोगामी संदेशचे संपादक सुरेश डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारताच्या संविधान प्रास्ताविकेला माल्यार्पण करून तथा दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.उद्घाटक गजानन बुटके यांनी पत्रकारिता निर्भिड असावी, एकाकी नसावी. पत्रकारांनी समाजातील अन्यायाला वाचा फोडणार लिखान करून समाजाप्रती शासनाला जागृत करावे असे मत मांडले. यावेळी सर्व पाहुण्यांनी आपले विचार मांडले.

साप्ताहिक लोकप्रतिष्ठा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अनेक पत्रकारांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पत्रकार इमरान कुरेशी, प्रमोद राऊत, संजय नागदेवते, अरविंद पिसे, केमदेव वाडगुरे, संपादक सुभाष शेषकर, स्वप्नील लांडगे, मानिक वाकडे, राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालय चिमुरचे रामदास कामडी, सुनिल हिंगणकर, मयूर गोडे, के. बी. अतकरे, मंगेश भुसारी मोनीश दुरुगकर,सागर वांढरे योगेश सहारे, केतन चियाले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार व प्रास्ताविक साप्ताहिक लोक प्रतिष्ठाचे संपादक रामकुमार चियाले यांनी केले. संचालन मुख्याध्यापक रामदास कामडी यांनी केले.