टेकाडी (दिक्षीत) ग्रामपंचायत, वायगाव रयतवारी गट ग्रा.प. तथा चारगाव तेलवासा ग्रामपंचायत येथे संस्थेचे कार्यवाहक विजयी

सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे यांच्या कार्याला प्रेरीत होवून संस्थेचे कार्यवाहक असलेले उमेदवार विजयी

 ✒️ मनोज कसारे(वाघेडा प्रतिनिधी) 

वाघेडा (दि.21 डिसेंबर) :-  भद्रावती तालुक्यातील सात ग्रामपंचायती करीता झालेल्या निवडणुकांचे आज (दि.२०) ला निकाल जाहीर झालेत. यापैकी टेकाडी दिक्षीत ग्रामपंचायत, वायगाव रयतवारी गट ग्रा.प. तथा चारगाव तेलवासा ग्रामपंचायत येथे अपक्ष उमेदवार निवडून आले. हे सर्व विजयी उमेदवार सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे यांच्या कार्याला प्रेरीत होवून व प्रस्थापितांच्या धन शक्तीला झुगारून विजयी झाले आहेत. विजयी उमेदवार हे संस्थेचे कार्यवाहक आहेत. सतत लोकोपयोगी कार्य करणाऱ्यांना मतदारांनी पसंती दाखविली असल्याचे चित्र या ग्रामपंचायत निवडणूक विजयाने स्पष्ट केले.

             टेकाडी येथील सरपंचपदी देवांगणा सत्यपाल झाडे तर सदस्यपदी मंजुळा प्रभाकर मानकर यांची निवड झाली. वायगाव रयतवारी येथे सदस्य चंद्रकला आकाश आत्राम, नितेश रामदास सोयाम यांची निवड झाली. 

          चारगाव तेलवासा येथील ग्रामपंचायत मधे सरपंच पदी आकाश मोरेश्वर जुनघरे, सदस्यपदी नितेश ईश्वर नगराळे, अनिता वासुदेव बोबडे, शालीन ज्ञानेश्वर किन्नाके, पांडूरंग विठ्ठल वांढरे हे उमेदवार निवडून आलेत.

            विजयानंतर सर्व उमेदवार रवि शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. व संस्थेच्या विश्वस्त सुषमाताई शिंदे यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

             या विजयामागे सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे, तुळशीराम श्रीरामे, बंडूभाऊ नन्नावरे, मारोती गायकवाड, प्रभाकर मगरे, सदानंद जिवतोडे, गिरीधर चौखे, नरेश चौखे, प्रकास नन्नावरे, महेन्द्र बारेकर, निर्णला बावणे, किरण बारेकर, सत्यपाल नन्नावरे, कवडू नन्नावरे, देवराव बेलेकर, सुर्यभान चटकी, भारत नगराळे, मोरेश्वर जुनघरे, पवन नगराळे, अवी नगराळे, दिनकर सिडाम, अमोल आत्राम, विजय धानकी, आशिष सिडाम, अजय पेंदोर, भारत ठाकरे, रमेश कोडापे, गणेश गोवारदिपे, सुरेश गोवारदिपे, सुरज जुमनाके, सुभाष मडावी, शुभम वांढरे, रमेश काळे, कुनाल सिडाम, श्रीनिवास सोयाम आदींचे परिश्रम आहेत. 

            यावेळी डाॅ. नरेन्द्र दाते, तेजस कुंभारे, प्रज्वल नामोजवार, अमोल शिंदे, संजय तोगट्टीवार आदी उपस्थित होते.