शुल्लक वादावरून शेतकऱ्याला बेदम मारहाण..पारडी येथील घटना

आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी 

✒️शेगांव(विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगांव (दि.20 डिसेंबर):- वरोरा तालुक्यातील येत असलेल्या पारडी येथे वयोवृध्द शेतकऱ्याला शुल्लक्षा कारणावरून बेदम मारहाण करून त्याला जिवेनिशी संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार नुकताच घडला असून या गंभीर प्रकरणाकडे स्थानिक शेगाव पोलिसांचे दुर्लक्ष असून आरोपी गावात सैरावैरा फिरत आहे तेव्हा आरोपीला अटक करून कडक कारवाईची मागणी पीडित शेतकरी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे .

सविस्तर असे की पीडित शेतकरी श्री नागोजी शामराव जुनघरे वय ५५ वर्ष राहणार पारडी यांच्या स्वमलकीचे स्प्रिंकर प्लास्टिक पाईप त्यांचेच नातलग यांनी फोडले असता. त्यांनी माझे पाईप भरून दे किंव्हा त्याची रक्कम दे असे बोलले असता या शुल्लक वादावरून आशिष बालाजी जुनघरे यांनी आपले हिंगणघाट येथील गुंड प्रवृत्तीचे मित्र बोलून बेदम मारहाण करून जीवेनिशी मारण्याचा प्रयत्न केला यात पीडित शेतकऱ्याचे नाक फोडून त्याच्या डोक्यावर देखील मारहाण केली तेव्हा त्याचा दुसरा मुलगा वडीलाला वाचाविण्या करिता गेला असता त्याला देखील मारहाण केली . हे भांडण जीवावर बेतण्यासारखे असल्याने गावातील मंडळी धाऊन आली तेव्हा आरोपी तसेच त्यांच्या मित्रांनी पळ काढला.

 तेव्हा स्थानिक शेगाव येथील पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली . व शेतकरी नागोजी जुनघरे यांना उपचारा करिता उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविण्यात आले .यात शेतकऱ्याला नाक व डोक्याला जबर मार असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे हलविण्यात आले व आजही उपचार सुरू आहे. असे सांगण्यात आले . 

 सदर ही घटना दिनाक १७ तारखेची असून तक्रार देऊन ४ दिवस लोटून देखील आरोपीला अजूनही अटक करण्यात आली नसून आरोपी अजूनही गावात फिरत आहे तेव्हा या गंभीर समस्या कडे लक्ष केंद्रित करून आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित शेतकरी यांचा मुलगा नितेश नागोजी जुनघरे यांनी केली आहे.

“”” घटना घडण्या आधी आरोपीने मला फोन केला होता व मला सुध्दा जिवंत मारण्याची धमकी फोन वरून दिली होती. घटास्थळी गावकरी गेले नसते तर माझ्या वडिलांचा व माझ्या भावाचा मृत्य झाला असता. चार दिवस लोटून देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही . मला तर वाटतं की आरोपी कडून पोलिसांनी पैसे तर घेतले नसावे . ? करिता माझे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असावा””” 

पीडित शेतकरी यांचा मुलगा. नितेश नागोजी जुनघरे .