14 ऑगस्टला भाजपाचे महाअधिवेशन

🔸विभाजन विभिषिकादिनाचे औचित्य

🔹ना.सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.9 ऑगस्ट) :- 

येथील भारतीय जनता पार्टी तर्फे बुधवारी(14 ऑगस्ट)जिल्हास्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन सायंकाळी 05 वाजता महेश भवन तुकुम,चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.यावेळी वने,मत्स्यपालन व्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कार्यकर्त्यांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे.

 भारतीय स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण होत आहे.आपण देश स्वतंत्र झाला म्हणत असलो तरी,या दिवशी देशाचे विभाजन झाले हे विसरता येत नाही.या विभाजनाचे दुःख कोट्यवधी नागरिकांच्या मनात आहे.त्यामुळे 14 ऑगस्ट हा दिवस भारतीय जनता पार्टी तर्फे ‘विभाजन विभिषिकादिन म्हणून पाळण्यात येणार आहे.तुकुम येथील महेश भवनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीं महाअधिवेशनासाठी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रसिद्दीपत्रकातून भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा) हरीश शर्मा व जिल्हाध्यक्ष(श)राहुल पावडे यांनी केले आहे.