३१ डिसेंबर च्या पार्शवभूमीवर शेगाव बु पोलीसांच्या बेधडक कारवाया

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

 

शेगाव बू (दि.1 जानेवारी) :- चंद्रपूर पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी संपूर्ण जिल्हाभर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यानवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्या नंतर काल पासून सम्पूर्ण जिल्ह्यातील पोलीस तसेच वाहतूक शाखा विशेष ऍक्शन मोड वर आलेली आहे. 

विविध कलमाच्या आधारे नियमाना धाब्यावर बसवत वाहतुकीच्या नियमाना कराच्या टोपल्या दाखवणाऱ्या बेशिस्त वाहंचालकाला लगाम लावण्यासाठी स्मपूर्ण जिल्हा पोलीस यांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.

यातच शेगाव पोलीस यांनी सुद्धा आता विना हेल्मेट, विना लायसन्स, ट्रिपल सीट, रश ड्राईव्ह, ड्रिंक अँड ड्राईव्ह, अल्प वयीन (१८ वर्षा खालील )वाहन चालक यांचेवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

त्या नुसार शेगाव पोलीस यांनी काल पासून काल आणि आज सायंकाळ पर्यंत इतर वाहतूक नियम मोडणाऱ्या ५५ वाहन चालक यांचे वर कारवाई केली असून, मागील वर्ष भरामध्ये ५२ ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे. 

त्या मुळे नवीन वर्ष चे स्वागत करताना अति उत्साहात धोकादायक पद्धतीने, मद्य प्राशन करून व वाहतुकीचे नियम मोडू नये व येणाऱ्या वर्षाचे विना अपघात होता साजरे करावे व आपले तसेच इतरांचे प्राण वाचवून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हाहन शेगाव पोलीस यांनी जनतेला केले आहे. व येणाऱ्या निविन वर्षाच्या पोलीस विभागाकडून समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्यात.