२० हजार शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना पात्र करून पीक विमा द्या

🔹भा. ज.पार्टी. वतीने महो.तहसीलदार साहेबाना निवेदन

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.1 जुलै) :- ०१/०८/२०२४ ला शेतकऱ्यांना पिक विमा आज पर्यंत मिळाला नसल्याने व वरोरा तालुक्यातील जवळपास २० हजार शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज अपात्र झाले आहे. पिक विमा मिळावा व अपात्र झालेले अर्ज पात्र करण्याकरीता वरोरा तहसिल कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदण देण्यात आले. वरोरा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाच्या आव्हानावरून खरीप हंगाम २०२३ मध्ये कापूस सोयाबिन तूर ई. पिकांचा विमा प्रती हे. १ रु. प्रमाणे योजनेत ओरिएन्टल इन्शुरन्स क.लि. पुणे. ४११००५ यांच्या कडे ऑनलाईन काढला.

वरोरा – भद्रावती तालुक्यात वर्धा नदी, कोंडा नाला, इरई नदी, शिरना नदी, दैवल नाला व छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये जुलै, आगस्ट, सप्टेंबर मध्ये आलेल्या पूर, सततच पाऊस, अतिवृष्टी अवकाळी पाऊस यामुळे सोयाबिन वर आलेला मोझॉक किड रोग ई. नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिक विमा नुकसान नियमानुसार ७२ तासात पुर्ण सुचना कंपनी कडे ऑनलाईन करण्यात आल्या. यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या नुकसानी प्रमाणे २५ टक्के अग्रीम सोयाबिनचे देण्यात आले पण आजपर्यंत ७५ टक्के रक्कम मिळाली नाही. तुर, कापुस पिकाचे २०२३-२४ हंगाम असूनही विमा भरपाई दिली नाही. पिक संरक्षणाकरीता विमा काढला, भरपाई करीता तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी कृषी व विमा कार्यालयात हेलपाट्या मारुन थकले यांचा प्रचंड मानसिक त्रास शेतकऱ्यांना झाला.

सोयाबीनचे पावसामुळे नुकसान झाले एवढेच नव्हे तर सोयाबीन या पिकावर आलेल्या मोझेंक रोगामुळे हाती आलेले पिक पुर्णतहः उद्वस्त झाले. कापासीची नापीकी यापुर्वी कधीही नव्हती एवढी झाली.

शेतकरी मार्च महीण्याकडे पिक विमा मिळेल या आशेने पूर्णतहा सरकार व पिक विमा कंपणीकडे मोठ्या आशेने वाट पाहत होते. पिक विमा काढणारे शेतकऱ्यांनी ७२ तासाचे आत पुर्ण सुचना पिकविमा कंपनीला दिल्या. बरेचदा कंपनीच्या टोल फ्री नंबर उशीरा लागत होतो. कंपनीची जबाबदार अधिकारी टाळाटाळीचे उत्तर देत होते.

कंपनीने फक्त २५ टक्के रक्कम दिली व उर्वरित ७५ टक्के रक्कम ७ महीण्याचा कालावधी होऊन सुध्दा दिलेली नाही. पिकाच्या संरक्षणाकरीता विमा काढला परंतू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासुन विमा कंपनीने वंचीत ठेवले आहे.

तसेच पिक विमा करीता अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांन पैकी वरोरा तालुक्यामधील जवळपास १५ ते २० हजार शेतकरी अपात्र झाले आहे. वेळोवेळो सर्वे करुन तथा हजारो शेतकत्यांचे अर्ज अपात्र कसे झाले असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात पडला.

पिक विम्याकरीता तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारुन शेतकरी आता त्रस्त झाले आहे. व त्यांचा मानसिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. एवढेच नव्हे तर नुकसानीचा अत्यंत्य कमी मोबदला देवून शेतकऱ्यांची थट्टा चालवीली आहे.

शेतकत्यांची अशी मागणी आहे की, लवकरात लवकर पिक विम्याची उर्वरीत ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी व अपात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची चौकशी करुन पात्र करण्यात यावे, तसेच आपल्या स्तरावरुन हे प्रकरण गंभीरतेने घेऊन मा. तहसिलदार तथा अध्यक्ष तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती वरोरा यांच्या अध्यक्षतेखाली मा. तहसिलदार यांच्या दालनामध्ये तक्रार निवरण बैठकीचे अयोजन करण्यात यावे व तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा. ही विनंती.

प्रमुख मागण्या :-

१. सोयाबीन नुकसान भरपाईची उर्वरित ७५ टक्के रक्कम तात्काळ वाटप करावी.

२. कापूस, तुर नुकसानी प्रमाणे १०० टक्के वाटप करावे.

३. अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई सर्व्हे शिट व माहिती देण्यात यावी.

४. अपात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची चौकशी करुन पात्र करण्यात यावे.

येत्या ७ दिवसांमध्ये आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण तालुक्यामध्ये पिक विमा कंपणी

विरुध्दात आक्रमक आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा भारतीय जनता पक्षाचे वरोरा विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रचार प्रमुख डॉ रमेश राजूरकर यांनी दिला. यावेळी तालुका डॉ. भगवान गायकवाड, शहर अध्यक्ष सुरेश महाजन, प्रदेश सचिव युवा मोर्चा करण देवतळे, मा. नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, मा. जिल्हा प. स. श्री राजुभाऊ गायकवाड, ओ.बी.सी आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे, जिल्हा संयोजक वैद्यकिय आघाडी डॉ सागर वझे, श्री राजु दोडके.

श्री विशाल पारखी, श्री उमेश माहुरे, श्री गजानन राऊत, श्री दिपक चव्हान, श्री देविदास ताजणे, श्री विनोद लोहकरे, श्री मधुसुदन टिपले, श्री सारंग किन्हेकर, श्री विजय पावडे, श्री राजुभाऊ दाते, श्री प्रकाश दुर्गपुरोहित, श्री निंबाळकरजी, श्री शरद कातोरे, श्री प्रमोद ढाकणे, शहर अध्यक्ष श्री संजय राम, जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी श्री अनिकेत नाकाडे, तालुका महामंत्री भाजयुमो. श्री सुरज धात्रक तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व संख्येने शेतकरी उपस्थित होते.