हिवरा संगम येथील अल्पभूधारक संतोष कदम यांनी फिरविला तीन एकर हरभऱ्याव‌र नांगर

🔸शासनाकडे तात्काळ मदतीचे आव्हान

✒️ गजानन लांडगे महागाव (Yavtmal प्रतिनिधी)

महागाव(दि.14 डिसेंबर) :- तालुक्यातील हिवरा संगम येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष उत्तमराव कदम यांनी आपल्या शेत सर्वे ९१/१/(ब) मध्ये रब्बी पीक म्हणून मोठ्या आशेने पिके व्हीटू हरभरा पिक आपल्या तीन एकर क्षेत्रात पेरणी केली होती.

मात्र निघालेला हरभरा वाळून गेला तर काही हरभरा निघालाच नाही त्यामुळे हरभऱ्यावर नांगर फिरवण्याची शेतकऱ्यावर वेळ आली तालुक्यात २६,२७,२८ नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे .

परंतु तालुका प्रशासनाने अद्याप पर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली नाही तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराची मदत शेतकऱ्याला मिळाली नाही आणि त्यानंतर लगेच अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरणी मोडले आहे तरी शासनाने तात्काळ मदत करावी असे आव्हान शेतकऱ्यांनी केले आहे .