हिवरा संगम [माहूर] येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पहिले अधिवेशन व कर्तबगार पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न

✒️संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.20 ऑगस्ट) :- समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभारत अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचे सामायिक अधिवेशन व राज्य स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२४ चे भव्य आयोजन मराठवाड्यातील एकविरादेवी संस्थान, हिवरा संगम, तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील सभागृहात नुकतेच करण्यात आले होते . प्रथमच पार पडलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्य स्तरीय अधिवेशन व सत्कार सोहळा कार्यक्रमाचे उदघाटन दीप प्रज्वलाने व थोर पुरुषांच्या फोटोला मालर्पण करून करण्यात आले.

याप्रसंगी उमरखेड विधानसभेचे माजी आमदार राजेंद्रभाऊ नजरधने यांचेसह माहूर दत्त संस्थान चे मठाधीपती साईनाथ महाराज, गोसाई शाम महाराज भारती, पंचायत समिती माजी सभापती गजानन कांबळे, ग्रामीण युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा केतकीताई पांडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी शालेय विद्यार्थीनींनी सुरेख स्वागत गीत सादर केले.

यानंतर प्रत्येक क्षेत्रातील कर्तबगार पत्रकार बंधू भगिनींचा शाल, मोमेन्टो पुष्पगुछ देऊन मान्यवरांचे हस्ते सहृद सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती मध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या विदर्भ महिला आघाडीच्या सचिव असलेल्या चंद्रपूरच्या जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन) यांच्याही नावाचा उत्कृष्ट महिला पत्रकार म्हणून समावेश होता. त्यांचा पुरस्कार त्यांचे वडील दीपक कटकोजवार यांनी आयोजकांच्या निमंत्रणावरून स्वीकारला. त्यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांचा गडगडात केला.

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पत्रकार बंधू भगिनींनी या अधिवेशनाला हजेरी लावली होती. यात प्रामुख्याने मुखेडचे सुरेश जमदाडे, पाटणबोरीचे विनोद कन्नाके, पांढरकवडाचे प्रफुल्ल नान्ने, गणेश सामजवार, बेले, चेतन सामजवार, चंद्रपूरचे सतीश आकुलवार आदींचा समावेश होता.