🔸ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा…अध्यक्ष प्रा.धनराज आस्वले
✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadarawati प्रतिनिधी)
भद्रावती (दि .10 फेब्रुवारी) :- तालुक्यातील ताडोबा अंधारी प्रकल्पाला लागुन असलेल्या खुटवंडा येथील कॅन्सर रुग्ण गजानन पाटील तसेच काटवल येथील मनोहर गजभीय या रुग्णास स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे उपक्रम श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियाना अंतर्गत उपचाराकरीता आर्थीक सहकार्य करण्यात आले.
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट हि एक सामाजिक संस्था असून समाजातील गोरगरीब-गरजू व्यक्ती, अनाथ विद्यार्थी, गरीब शेतकरी तसेच समाजातील दुर्बल घटक यांना न्यासच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक मदत करीत असते. ट्रस्टच्या उद्देशानुरूप समाजाच्या मदतीकरीता वेगवेगळे असे मुख्य सात अभियान राबवीत आहे.
ट्रस्टव्दारे राबवीण्यात येत असेलेली अभियाने उपक्रमे पहिले श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान योजनेअंतर्गत नि:शुल्क कोविड केअर सेंटर, भव्य आरोग्य तपासणी व उपचार शिबीर, रुग्ण उपचारसेवा मदत कार्य, कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक सहकार्य. दुसरे विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन सामाजिक उपक्रम अंतर्गत ग्रामिण जनतेमध्ये जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम, व्यसनमुक्त गाव अभियान, अवैद्य व्यवसाय मुक्त गाव अभियान, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत व सेवा, लघु व्यवसायिकांना प्रोत्साहनपर मदत, स्वाभिमानी व स्वावलंबी युवक योजना, बचतगट सक्षमीकरण व महिला उत्थान कार्यक्रम, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी मृत नागरीकांच्या कुटुंबास आर्थीक सहकार्य.
यातीलच तिसरे स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना अंतर्गत आत्महत्याग्रस्त गरीब गरजू शेतकरी-शेतमजुर कुटुंबातील व निराधार विद्यार्थ्यांनां शिक्षणाकरीता शैक्षणिक दत्तक घेणे तसेच शिक्षणाचा खर्च वहन करणे. चौथे अभियान कै. म ना पावडे क्रिडा स्पर्धा योजनेअंतर्गत विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा आयोजन करणे, खेळाडूंना खेळासाठी प्रोत्साहन देणे, खेळाडूना खेळाकरीता सहकार्य करणे. पाचवे अभियान हे डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांकरीता शिबीरांचे आयोजन करणे, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थीक सहकार्य करणे, प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार गौरव करणे.
समाज हिताच्या दृष्टीने नव्यानेच दोन अभियानाची सुरुवात या आर्थीक वर्षापासून सुरु करण्यात आलेली असून यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनां शिक्षणाकरीता शालेय साहित्य वितरण करणे. अभ्यासिकेला मागणीनुसार स्पर्धापरीक्षा पुस्तके उपलब्ध करुन देणे. अभ्यासिकेला मुलभुत साहित्य देणे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकरीता शिबीरांचे आयोजन करणे. तसेच हिंदुहृदय वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना अंतर्गत दिव्यांगांना तीनचाकी सायकल वितरण करणे. दिव्यांगांना कर्ण यंत्र, कृत्रीम अवयव उपलब्ध करुन देणे, दिव्यांगाकरीता रोजगार शिबीराचे आयोजन करणे.
खुटवंडा येथील गजानन पाटील हे कॅन्सर रोगानी ग्रस्त असून उपचार सुरु आहे तसेच काटवल येथील मनोहर गजभिये हे दुर्धर आजाराने ग्रस्त असून आर्थीक परिस्थीतने कुमकुवत असल्यामुळे आर्थीक मदतीकरीता चिचोली येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मालेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते मुधोली सरपंच बंडूपाटील नन्नावरे यांच्या संपर्कात आलेत. गोर गरीब लोकांच्या परिस्थीतीची जाणीव असल्यामुळे संबंधीत कार्यकर्ते यांनी ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे तसेच अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांच्याशी संपर्क साधत मदतीकरीता विनंती केली.
संपुर्ण परीस्थीती लक्षात घेता रुग्णांना पुढील उपचाराकरीता ट्रस्टच्या माध्यमातून धनादेशव्दारे आर्थीक सहकार्य करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टच्या कोषाध्यक्ष सुषमा शिंदे, भद्रावती कृ.उ.बा.स. सभापती भास्कर ताजणे, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगर सेवक नरेन्द्र पढाल, मुधोली सरपंच बंडूपाटील नन्नावरे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल हनवते, राहुल मालेकर, विलास पडवे तसेच ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यवाहक तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.
याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले तसेच संस्थापक विश्वस्त रविंद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या सुरु असलेल्या अभियान उपक्रमाची माहिती उपस्थित नागरीकांना देत गरजु व्यक्तीनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.