स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टची सामाजिक बांधिलकी

🔹विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी दत्तक , रुग्णांना उपचारासाठी सहकार्य, दिव्यांगाना सायकलचे वाटप

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.7 ऑक्टोबर) :- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या माध्यमातून सतत सामाजिक बांधिलकी जपल्या जात आहे. ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ट्रस्टने गोरगरीब, गरजवंत निराधार अशा असंख्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेतले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्चाचा भार ट्रस्टने उचललेला आहे. यामुळे ग्रामीण व शहरी क्षेत्रातील असंख्य गोरगरीब, गरजवंत व निराधार विद्यार्थांच्या शैक्षणिक जीवनातील अडचणी दूर झाल्या आहे. ट्रस्टच्या माध्यमातून अनेक रुग्णांना औषधोपचारासाठी सहकार्य केल्या गेले. यात कॅन्सरग्रस्त व इतर आजार असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ट्रस्टच्या माध्यमातून असंख्य दिव्यांगांना तीन चाकी सायकल मोफत देण्यात आलेली आहे. याशिवाय अपघातात जखमी झालेले रुग्ण, दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांचे वारसदार यांच्यासाठी सुद्धा ट्रस्ट मदतीचा हात पुढे करीत आहे. गोरगरीब जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ट्रस्ट तत्पर आहे. ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कोषाध्यक्ष सुषमाताई शिंदे, सचिव रूपाली रवींद्र शिंदे आणि समस्त कार्यवाहक ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजना सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी अविरतपणे कार्य करीत आहे.

आनंदवनच्या स्वरानंदवन आर्केस्टाला मदतीचा हात :- शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी आनंदवनच्या स्वरानंदवन आर्केस्टाला मदतीचा हात देत तेथील दिडशे दिव्यांग कलाकारांना सतत प्रेरणा दिली. स्वरानंदवन प्रकल्पातील अंध आणि अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना संगीत शिकविण्यासाठी नागपूर येथील पद्मभूषण दिवंगत प्रभा अत्रे यांच्या शिष्या रसिका करमालेकर येत असतात. परंतु रसिका करमालेकर ह्मा नागपूर वरुन आनंदवन ला दररोज येवून येथील विद्यार्थांना संगीताचे धडे देवू शकत नव्हत्या. ऑनलाईन संगीत क्लास साठी प्रोजेक्टरची गरज होती.स्वरनंदवनचे प्रमुख आणि विश्वस्त सदाशिव ताजने यांनी ही अडचण शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या लक्षात आणू दिली. रवींद्र शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयातील नवीन खरेदी केलेले प्रोजेक्टर तात्काळ स्वरानंदवन आर्केस्टाला भेट दिले.

रवींद्र शिंदे यांनी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सर्वप्रथम कोंढा या गावात श्रदेय बाबा आमटे आरोग्य अभियान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विकास आमटे यांना आमंत्रीत करण्यात आले.डॉ. विकास आमटे यांच्या शुभहस्ते श्रदेय बाबा आमटे आरोग्य अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ट्रस्टच्या वतीने आजपर्यंत गावो गावी सुमारे शंभरपेक्षा अधिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले.रवींद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून दिव्यांग बंधू-भगिनींना देण्यासाठी आनंदवन येथे तयार होणाऱ्या अनेक तीन चाकी सायकल खरेदी करून आनंदवनसाठी फार मोठे आर्थीक योगदान दिले.