✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.16 ऑगस्ट) :-
दिनांक १५ आगष्ट २०२४ ला ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य दिनानिमित्त वर्षं भर चालणारे कार्यक्रम व आॅक्टीव्हीटी यामध्ये अधिकारी व कर्मचारी हिरीरीने भाग घेतात.आणी त्यांच्या कर्तव्यामूळे कांहीं उच्चांक गाठले जातात.त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय वरोरा ला कायाकल्प व सूमन ,एनक्वास, मुस्कान या सारख्या उपक्रमांमध्ये प्रावीण्य मिळविले आहे.तसाच या वर्षीचा कायाकल्प व सूमन व एनक्वास अवार्ड मिळालेले आहे.त्यात अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणात पत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच फ्लारेंन्स नाईटिंगेल नर्सेस विक प्रोग्राम मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्याचा बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला.त्यामध्ये मोमेन्टों व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच स्तनपान सप्ताह कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला.बक्षीस वितरण करुन जल्लोष पुर्ण गाणें गाऊन स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक ,डॉ अश्विनी गेडाम स्त्रीरोगतज्ज्ञ ,वंदना विनोद बरडे अधीसेवीका, डॉ स्नेहाली शिंदे नेत्र शल्यचिकित्सक ,डॉ आकुब शेख , ईत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली.