▫️लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त(Seizure of goods worth lakhs of rupees)
✒️आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.18 ऑगस्ट) :- पोलीस स्टेशन शेगाव बू अंतर्गत दिनांक 17.8.23 रात्री दरम्यान गुप्त बातमीदार यांचे कडून माहिती मिळाली की 14 चक्के ट्रक क्रमांक cg 08 AC 4500 यामध्ये अवैध सरकारी कंट्रोलचा तांदूळ बाजारात विक्री करता जात आहे. अशा खात्रीशीर बातमी मिळून आल्याने स्टाफ सह खातोडा जुना बस स्टॉप येथे गोवंश कारवाई करत असताना नाकाबंदी केली. वरोराकडून येणाऱ्या ट्रक याला थांबून चालकास त्याचे ना विचारले त्यांनी त्याचे नाव माणिकराव रामाजी कोचे वय 63 रा. कासारवाडी जिल्हा दुर्ग छत्तीसगढ असे सांगितले.
सदर ट्रक मध्ये काय आहे असे विचारले असता चालकांनी उडवली ची उत्तर देणे सुरू केले. पोलीस स्टाफ च्या मदतीने पाहणी केली असता त्यामध्ये तांदूळ असल्याचे दिसून आले. ट्रक चालक याला मालकाला बोलवा असे सांगितले असता मालक हजर झाले नाही. सदर ट्रक मधील तांदूळ हा शासकीय कंट्रोलचा तांदूळ दिसून येत असल्याने पुरवठा निरीक्षक वरोरा यांचे प्राथमिक अहवाल प्राप्त करून सदर ट्रकचालक व मालक यांच्यावर इसी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक परदेशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक जनबंधू मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव चिमूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन शेगाव बू चे ठाणेदार अविनाश मेश्राम, पीएसआय सुरजुसे एसआय पडोळे, हेड कॉन्स्टेबल मेश्राम, मदन येरने, पोलीस आमदार निषाद राकेश , प्रफुल कांबळे यांनी केली.