स्वमालकीच्या शेतात दुसऱ्याचे एव्यध्य बांधकाम  Improper construction of another’s property on the farm

▫️बांधकाम हटविण्याची शेतकऱ्याची पायपीट

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.12 जुलै) :- येथून जवळच असलेल्या गुजगव्हान येथे शेगाव येथील रहिवासी श्री काशिनाथ दामोधर सिधमसेट्टीवार यांची स्वमलकीची शेती भू मा क्र. 95 आराजी 2.51 वरोरा चिमूर रस्त्यालगत गुजगव्हांन चौकात आहे .

तर यांच्या शेतामध्ये गुजगव्हान येथील संदीप हरी माथणकर यांनी सिधमसेट्टीवर यांच्या शेतामध्ये इमारतीचे पक्के काम करीत असून पिलर, सिमेंट चे कांक्रेट व साहित्य टाकून बांधकाम सुरू केले असल्याने पीडित शेतकऱ्याला मानसिक त्रास दिला जात असल्याने हे ऐव्यद्य बांधकाम तात्काळ रोखून त्याला पाडण्यात यावे अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनातून तहसीलदार साहेब यांना सदर करून मागणी केली आहे ..

सविस्तर असे की गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यालगत यांच्या शेतामध्ये छोटासा दर्गा समाधी असून या समाधीवर छत उभारण्यासाठी संदीप माथनकर यांनी अवाढव्य जागेवर बांधकाम करण्यास सुरुवात केली . तेव्हा हे बांधकाम रोखण्यात यावे असे सांगितले असता तेव्हा संदीप यांनी पीडित शेतकऱ्याला उधट बोलून आपली मनमानी केली . 

         तेव्हा हे एव्यद्य बांधकाम बंद करण्यात यावे व या करिता स्थानिक समधित विभागाला व तहसीलदार यांना निवेदन सादर करून न्याय मागण्यासाठी धडपड करीत आहे तेव्हा संबधित विभागाने तात्काळ लक्ष केंद्रित करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी व पक्के असलेले काम बंद पडून त्याला कायमस्वरूपी पाडण्यात यावे अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे..