सोयाबीन पिक गेले हातुन निघुन,हरबऱ्याची लागली वाट शेतकरी राजा दुहेरी संकटात

🔹शेतकरी राजाला तात्काळ आर्थिक मदत द्या प्रहार सेवक तथा विनोद उमरे यांची मागणी

 ✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.18 जानेवारी) :- सोयाबीन कापनी नंतर बहुतांश शेतकरी राजांनी शेतात हरभरा पिकाची लागवड केली.पण खरिब हंगामात सोयाबीनवर झालेल्या पावसाने व योलो मोझ्याक रोगामुळे उत्पादनात कमालाची घट झाली.परिणामी लागवड खर्च निघाला नाही . सोयाबीन पिकात झालेला तोटा भरुन काढण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हरभाऱ्याची लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केली आहे.

हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाला.अळ्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी फवारणीवर वाजवी पेक्षा अधिक खर्च करावा लागला.सुरुवातीला पाऊस चांगला पडला.मशागत व आवश्यकतेनुसार खतांचा वापर केला.हरभऱ्या पिकाले मोठा खर्च झाला.अळ्यामुळे,व रोगामुळे हरभरा पिकाची वाट लागली आहे.सोयाबिन,हरभरा अशा दुहेरी नुसकानात शेतकरी राजा संकटात अडकला आहे.तरी शेतकरी राजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तात्काळ अनुदान देऊन शेतकरी राजा ला दुहेरी संकटांतून बाहेर ‌काढावे. अशी मागणी शेतकरी नेते तथा प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे