सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या मागणी ला यश 

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.24 जुलै) :- दिनांक 16 जुलै 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा वतीने मा. पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. 

आताच चंद्रपूर जिल्हा मध्ये पोलीस भरती झालेली आहे त्या पोलीस भरती मध्ये काही उमेदवार पात्र झाले तर काही उमेदवार भरती मध्ये अपात्र झाला आहे. त्याच्या हाती निराशा / खताश झालेले आहे.

हि बाब सुरेश मल्हारी पाईकराव यांनी लक्षात घेता व चंद्रपूर जिल्हाची वाढती बेरोजगारी पाहुन त्यांनी पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती की आपण आपल्या स्तरावर चंद्रपूर जिल्ह्य़ामध्ये तातडीने होमगार्ड भरती करुन जे उमेदवार खताश झाले किंवा चंद्रपूर जिल्ह्य़ातील बेरोजगार युवकांना /युवतीना  त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा. अशी मागणी सफेद झंडा कामगार संघटनेचे वतीने करण्यात आली होती त्यांचा मागणी ला यश आले असुन आता चंद्रपूर जिल्ह्य़ामध्ये होणार आहे होमगार्ड भरती ची प्रक्रिया सुरू

चंद्रपूर जिल्हयामध्ये होमगार्डमध्ये 82 होमगार्ड पदे रिक्त आहेत.

सदस्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी 22 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर येथे होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराकडून 10 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून होमगार्ड नोंदणी माहिती पत्रक, अटी व शर्तींची तपशीलवार माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे.