सुप्रसिद्ध गायिका किरन पाटनकर यांचे दुःखत निधन 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.5 फेब्रुवारी) :- फुले शाहू आंबेडकर चळवळीला आपल्या गायनाच्या माध्यमातून त्यांचे विचार बहुजन समाजातील बांधव यांच्या काना पर्यंत पोहचून फुले शाहू आंबेडकर रमाई यांची विचार सरणी अमरत्व ठेऊन नागरिकांना जागृत करण्याचे मोलाचे कार्य सुप्रसिद्ध गायिका किरण पाटणकर यांनी केले असून त्यांच्या कुटुंबातील वडिलोपार्जित चाललेल्या या वारस्यायाला समोर नेण्याचे कार्य करीत होते परंतु त्यांच्यावर अल्पष्य आजाराने त्यांच्यावर काळाची झळाप घातल्याने त्यांची दुःखद निधन झाले . 

        या दुःखद बातमी ने संपूर्ण महाराष्ट्र च नव्हे तर संपूर्ण भारत दुःखी झाले असल्याचे सुखमय वातावरण सोशल मीडिया वर दिसून येत आहे शिवाय संपूर्ण बहुजन समाज दुःख व हळहळ व्यक्त करीत आहे .

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तेजस्वी आंदोलनाला गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे स्मृतिशेष लोककवी सूरसम्राट नागोराव पाटणकर यांची मुलगी बौद्ध – भीम गित गायीका किरण पाटणकर यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 5 फरवरी 2024 ला दुपारी 12 :00 वाजता निधन झाले

अंतिम यात्रा आज 5/2/24 ला ५:००वा , निवास बेज़नबाग गार्डन ले आऊट ते वैशाली घाट ला जानार असल्याची माहिती मिळाली आहे.