✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.18 जून) :-
सी. एम.पी. एल. माती उत्खनन या कंपनीतील कार्यरत स्थानिक कामगारांना कंपनीचे काम संपल्याचे सर्व कामगारांना पत्र पाठवून कामावरून डावलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे.
तर परप्रांतीय कामगारांना तसेच वाहनचालकांना सदर कंपनीचे सुरु असलेले दुसरे काम राजुरा सास्ती येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्याने त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक कामगारांना कामावरून न काढता सास्ती येथे स्थलांतर करण्यात यावे. याकरिता कामगारांनी राजुरा तहसील कार्यालयासमोर दिनांक 10 जून 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
कामगारांचा या न्यायिक मागण्याला आज आम आदमी पार्टी तर्फे समर्थन देण्यात आले.
यावेळेस आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, म्हणाले की जिल्ह्यात सर्वीकडे स्थानिक कामगारांना कंपनी प्रशासन डावलण्याचे काम करीत आहे. यावर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न करता मुंग गिळून गप्प बसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी तथा पालकमंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे ते म्हणाले.
यावेळी जावेद सय्यद महानगर अध्यक्ष अल्पसंख्यांक, जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, मनीष राऊत संघटन मंत्री, आदित्य नंदनवार युवा जिल्हा सचिव तर धरणे आंदोलनात आंदोलनकर्ते सुरज उपरे, भूषण भाऊ फुसे, आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, अजय इग्रपवार, साई कुमार मोगलीवार, राकेश चेनमेंवार, श्रीकांत जलावार, उपस्थित होते.