✒️ संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे(दि.20 सप्टेंबर) :- निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द येथे सिम्बॉल ऑफ नॉलेज सामाजिक संस्थेच्या वतीने व संस्थेचे अध्यक्ष राकेश निकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
दिनांक १९ सप्टेंबर रोजी सिम्बॉल ऑफ नॉलेज संस्थेच्या अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मराठी शाळा सोनेवाडी येथे इत्या पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून वया व अंक लिपी व पेन वाटप करण्यात आले.
तसेच सर्व जिल्हा परिषद शाळा, वृद्धाश्रम, अंध विद्यालय, इत्यादी गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येईल,आणि संस्थेचे समाजसेवेचे कार्य अशाच प्रकारे चालू राहील असे संस्थेचे अध्यक्ष राकेश निकाळे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सध्या कमी होत चाललेली आहे, ती संख्या वाढवण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संस्था प्रयत्न करत राहणार आहे असे यावेळी बोलण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक व पदाधिकारी, उपाध्यक्ष दादाराव काऊतकर , सचिव प्रेम वाघ, कोषाध्यक्ष विनोद गायकवाड, सहसचिव प्रवीण कोळी, सदस्य सुनील साळवे, योगेश गायकवाड, दादाराव पंडित, विक्रम आढाव, सचिन खडताळे उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वामन जाधव सर, शिक्षक नितीश पवार, शिक्षिका ज्योती सानप यांचे सहकार्य लाभले, तसेच शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष गणेश मोरे, सरपंच अशोकराव आव्हाड, उपसरपंच छायाताई सोमनाथ सानप, प्रकाश भाऊ बांगर, पप्पू माळी, श्रीकांत माळी ,अमोल पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.