सिकलसेल आजारा विषयी जनजागृती Awareness about sickle cell disease

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.2 जुलै) :- भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते संपुर्ण भारतात सिकलसेल या धुरंधर आजारांचे उद्घाटन करण्यात आले.हे उद्घाटन देशातील प्रत्येक आरोग्य केंद्रांत करण्यांत आले. हे उद्घाटन आॅलाआईन करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे सिकलसेल आॅनेमिया निर्मुलन हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला मा.डाॅ . प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ मूंजनकर तालुका अधिकारी,मा.सुभाषजी दांदडे आमदार प्रतीनिधी,मा सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका, आवर्जून उपस्थित होते.आनंदिबाई जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करून दिपप्रज्वलन मान्यवरांनी आदरांजली वाहिली.मांन्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

डाॅ खुजे वैद्यकीय अधीक्षक यांनी या आजारांची सविस्तर माहिती दिली . सर्व सिकलसेलग्रसत रूग्णांना कार्डचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करण्यात आली.

एकूण २५ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात ४ पाझिटिव्ह निघाले. २१ चे रिपोर्टस निगेटिव्ह आलें.तपासणीचे काम पुनम धांडे, लाॅब टेक्निशियन, जान्हवी,व विक्कि भगत यांनी केले.अमोल भोग आरोग्य मित्र यांनी १२ आभा कार्ड व २१ आयुष्यमान कार्ड काढलें.. प्रोजेक्टरवर सर्व माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोविंद कूंभारे व आभारप्रदर्शन श्री सतिष येडे यांनी केले.या कार्यक्रमाला सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका 

सौ सोनल दांडगे अधिपरिचारीका,कु प्रणाली गाथे अधिपरिचारीका, नेहा ईंदुरकर काऊन्सिलर , श्री मडावी वरिष्ठ लीपिक , श्री विजय एके ,कुंदा मडावी, चंद्रशेखर समूद्रे, श्री कैलाश समूद्रे, यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाला सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.